जॉयसी जगातील सर्वात सुंदर उबेर टॅक्सीचालक

0
101

नवी दिल्ली, १७ मे 
फिलिपिन्समधील एका टॅक्सीचालक महिलेसंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, तिचे अनेक फोटो झळकले आहेत. कारण ही महिला तरुण आणि सुंदर तर आहेच; पण अतिशय हजरजबाबी व प्रवाशांबरोबर गप्पागोष्टी करून त्यांचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये याची काळजी घेणारी आहे.
ती दिवसातून १२ तास उबेरसाठी टॅक्सी चालविण्याचे काम करते व विशेष म्हणजे तिची टॅक्सी एकदाही रिकामी राहात नाही. २७ वर्षीय जॉयसी प्रथम रुग्णालयात रिसेप्शनिस्टचे काम करत होती मात्र त्या कामाचा तिला कंटाळा आल्यावर तिने टॅक्सीचालक बनण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता ती उबेरची जगातील सर्वात सुंदर टॅक्सीचालक बनली आहे. तिच्या वयाचे तरुण जॉयसीच्या टॅक्सीला प्राधान्य देतातच, पण वाहतूक कोंडीत टॅक्सी अडकली तरी ते कोणतीही तक्रार करत नाहीत. जॉयसी सांगते मी त्यांच्याबरोबर गप्पा मारते, त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देते व ते प्रवासी नाहीत तर माझ्या घरचेच कोणी आहेत अशा भावनेने वागते. यामुळे अनेक जण खुश होऊन माझ्यासोबत फोटो काढायची विनंती करतात व मी ती टाळत नाही. माझ्या सौंदर्याची तारीफ ते करतात तेही मी आनंदाने स्वीकारते. (वृत्तसंस्था)