ओबीओआरवरून भारताचे राजकारण

0
185

चीनी प्रसारमाध्यमांची टीका
बीजिंग, १७ मे
वन बेल्ट वन रोड या प्रकल्पावरून भारत राजकारण करीत असून, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीच चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे मत चीनी प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे.
चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे की, भारत अधिक सक्रियतेने द्विपक्षीय संबंधांना आकार देऊ शकतो आणि चीनने भारताच्या हितांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी भारताची इच्छा आहे. मात्र, दोन देशांमध्ये अशा प्रकारचा संवाद होऊ शकत नाही. ओआरओबीला भारताचा होणारा विरोध, हा चीनवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, या बाबीचा चीनवर कुठलाही फरक पडणार नाही. ५० अब्ज डॉलर्सच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवरील स्वतःच्या सार्वभौमत्वामुळेच भारताने या प्रकल्पात सहभाग घेतला नाही. पाकिस्तान आणि चीनचा हा आर्थिक कॉरिडोर पाकव्याप्त काश्मीरमधून जात आहे. (वृत्तसंस्था)