गावाला बनविले परिराज्य

0
178

जकार्ता, १७ मे 
इंडोनेशियातील एका गावाचा चेहरामोहराच माध्यमिक शाळेच्या एका मुख्याध्यापकाला सुचलेल्या कल्पनेने बदलला गेला आणि सरकारने आता लाखो रुपये खर्च करून ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. इंडोनेशियातील लहान गावांचे झोपडपट्टीसारखे असलेले स्वरूप यामुळे आमूलाग्र बदलले आहेच, पण ही गांवे रेनबो व्हिलेज म्हणून प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागली आहेत. इंडोनेशियातील अगदी छोटे असे कांपुंग पेलंगी गाव जुनी पुराणी व मोडकळीस आलेल्या घरांमुळे झोपडपट्टीसारखे दिसत असे. ५४ वर्षीय स्मेर विडोदो या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने यावर ही घरे विविध रंगात रंगविण्याची कल्पना काढली आणि पाहता पाहता सगळ्या गावाचा चेहरा बदलून गेला. मग सेंट्रल जावा कम्युनिटी सरकारकडे विडोदो यांनी हा प्रस्ताव सादर केल्यावर सरकारने १४ लाख रुपये खर्च करून ३९० पैकी २३२ घरे अशी रंगीबेरंगी केली आणि गावाला परी राज्याचे स्वरूप मिळाले. अन्य तीन गावेही याच पद्धतीने रंगली आणि त्यांचेही रूप पालटले. या कल्पनेमुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल अशी आशा आता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)