चीअर लीडर्समुळे पुरुषांच्या गुणवत्तेत सुधारणा

0
167

बीजिंग, १७ मे
चीअर लीडर्स या आयपीएलमुळे घरोघरी पोहोचल्या आणि त्या अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर आता चीअर लीडर्सना अनेक स्थानिक टुर्नामेंटमध्येही मागणी केली जात आहे. पण ही मागणी आता केवळ क्रिकेटपुरती मर्यादित राहिलेली नसून ती ऑफिसपर्यंत पोहोचली आहे.
चीनमधील एका टेक कार्यालयाने ऑफिसमध्ये काम केल्याने थकवा जाणवू नये म्हणून मनोरंजनासाठी चीअर लीडर्स भाड्याने आणल्या आहेत. विशेष म्हणजे चीअर लीडर्स आल्यापासून कंपनीतील पुरुष कर्मचार्‍यांच्या कामात लक्षणीय सुधारणा झाल्याचेही कंपनी सांगत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने टॅलेंटेड चीअर लीडर्स कंपनीत नेमल्या आहेत. या चीअर लीडर्स कर्मचार्‍यांना कंटाळा आला असेल तर त्यांचे मनोरंजन करतात, त्यांचा मूड ऑफ असेल तर तो ठीक करतात, त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात, पिगपॉंग खेळतात. यामुळे कर्मचार्‍यांना मोटिव्हेशन मिळते व ते अधिक जोमाने व वेगाने त्यांची कामे पूर्ण करतात.
या चीअर लीडर्स कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंदी ठेवण्यास खूपच उपयोगी पडतात तसेच त्यांच्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचा आपसातील संवाद वाढतो परिणामी एकमेकांच्या सहकार्याने कामे निपटण्याकडे कर्मचार्‍यांचा कल वाढतो, असाही अनुभव येत आहे. (वृत्तसंस्था)