मुकेश अंबानी ‘ग्लोबल गेम चेंजर्स’

0
199

फोर्ब्सची यादी जाहीर
न्यूयॉर्क, १७ मे 
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी फोर्ब्स पत्रिकेच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत अव्वल स्थान पटकाविले आहे. ‘गेम चेंजर्स’ नावाच्या दुसर्‍या वार्षिक यादीत जगभरातील २५ जणांची नावे जाहीर करण्यात आली. यात मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत.
‘जैसे थे’ न राहता उद्योगांचे रूप पालटून जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेल्या व्यावसायिकांची ही यादी फोर्ब्सने प्रकाशित केली आहे. तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील सम्राट ६० वर्षीय अंबानी यांनी भारताच्या दूरसंचार क्षेत्रात उतरताच मोठे धडाकेबाज कार्य केले. त्यांनी ‘जियो’च्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती केली. शिवाय लाखो सामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. ‘जियो’ने गेल्या सहा महिन्यात सुमारे दहा कोटी ग्राहक जोडले, असे फोर्ब्सने म्हटले आहे. जियोच्या स्वस्त इंटरनेट सेवांमुळे अन्य कंपन्यांनाही आपल्या दरात कपात करावी लागल्याने भारतात दूरसंचार क्रांती घडली. अंबानी यांच्याशिवाय फोर्ब्सच्या यादीत ‘डायसन‘ कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी अरबच्या राजघराण्यातील दुसरे राजकुमार मोहम्मद बिन सलमान, अमेरिकन कंपनी ब्लॅकरॉकचे सहसंस्थापक लॅरी फिंक, सोशल मीडिया कंपनी ‘स्नॅप’चे सहसंस्थापक इवान स्पाईजेल, चीनचे दीदी चुसिंग आणि आफ्रिकेतील रिटेल टायकॉन क्रिस्टो वीजे आदींचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)