किंग खानची गुणपत्रिका व्हायरल

0
160

मुंबई : दिल्ली विद्यापीठाच्या ‘डीयू टाईम्स’ फेसबुक पेजवर किंग खानच्या ऍडमिशन फॉर्मचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. मुख्य म्हणजे या फॉर्ममध्ये नमूद केल्यानुसार इंग्रजी विषयात त्याला फक्त ५१ गुण मिळाले होते. जो किंग खान इतक्या सहजतेनं अस्खलित इंग्रजी बोलू शकतो, त्याला या विषयात इतके कमी गुण कसे, हीच चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळतंय. गुणपत्रिकेसोबतच शाहरुखच्या महाविद्यालयातील फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.