तेलगु अभिनेत्याचे ट्विटर अकाऊंट हॅक

0
155

मुंबई : तेलगु अभिनेता पवन कल्याणचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. पवन कल्याणने २०१५ मध्ये ट्विटरवर अकाऊंट सुरू केले होते. तेव्हापासून पवन ट्विटरवर फार सक्रिय राहायचा. या ट्विटरच्या माध्यमातून तो नेहमीच त्याची मतं लोकांसमोर मांडत असतो. पवनचे ट्विटरवर २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ८ मे पर्यंत पवन त्याच्या ट्विटरवर सक्रिय होता. पण, गेल्या तीन दिवसांपासून त्याचे ट्विटर अकाऊंट सुरू नसल्याची तक्रार त्याने केली. पवनला काही तांत्रिक बिघाडामुळे ट्विटर सुरू होत नसेल असे वाटले. पण, नंतर आपले अकाऊंट हॅक झाल्याचे कळताच त्याने याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.