लवकरच प्रदर्शित होणार ‘ताटवा’

0
184

मुंबई : एकीकडे जात या संकल्पनेचे समूळ नष्ट करण्याचे भाष्य करत असताना जातिपातीचे राजकारण खेळणारी सुशिक्षित माणसे सभोवताली वावरताना दिसतात. याच विचारधारेवर आधारित ‘ताटवा’ हा नवा मराठी सिनेमा येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शरयू आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या सिनेमाचं दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केलं आहे. ‘प्रेम’ आणि ‘कला’ या दोन गोष्टी अशा आहेत की, ज्यांना जातीचे बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. या सिनेमाची कथा शिल्पा या ‘पाथरवट’ समाजातील मुलीच्या जीवनावर बेतलेली आहे.