इंडिया ग्रीड ट्रस्टचा ‘इन्व्हिट फंड’ खुला!

0
64

गुंतवणूक करण्याची संधी
मुंबई, १७ मे
रस्ते विकास क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.च्या देशातील पहिल्या पायाभूत गुंतवणूक विश्‍वस्त कोशाच्या म्हणजेच इन्व्हिट फंडाच्या उभारणीनंतर आजपासून (बुधवार) इंडिया ग्रीड ट्रस्टची प्रारंभिक खुली विक्री सुरू झाली. वीज पारेषणाचे जाळे असलेल्या इंडिया ग्रीड ट्रस्ट या विक्रीतून रु.२२५० कोटींचे भांडवल उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे.
केंद्र सरकारने २०१५ च्या अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच इनव्हिटच्या माध्यमातून निधी उभारण्यास परवानगी दिली होती. आता इंडिया ग्रीडसाठी ९८ ते १०० रुपये किंमतपट्टा निश्‍चित केला आहे.
या इन्व्हिट फंडासाठी रु.१०० दराने बोली लावता येणार आहे. मात्र किमान दहा हजार युनिटसाठी (किमान गुंतवणूक रु.१० लाख २० हजार) अर्ज करावा लागेल आणि त्यापुढे पाच हजार युनिट्सच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. इन्व्हिट फंडातील युनिट्स मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी करण्यात येतील. त्यामुळे शेअर बाजारातील शेअर्सप्रमाणे त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील.
देशातील पहिल्या इनव्हिट अर्थात् इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असलेल्या आयआरबी इनव्हिटच्या युनिट्सची उद्या शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने रु.१०० ते १०२ किंमतपट्टा निश्‍चित केला होता. ५ मेदरम्यान आयआरबी इन्व्हिट फंड खरेदीसाठी खुला करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)