पॅरामोटरमध्ये भारताला सुवर्ण

0
126

अहमदनगर, १७ मे
पॅरामोटर या साहसी क्रीडा प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देऊन राहुरीच्या आप्पासाहेब ढुस यांनी इतिहास घडविला आहे़. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या जागतिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप स्पर्धेतील आप्पासाहेब ढुस यांचा सहभाग निश्‍चित झाला आहे़
एशियन-ओशियानिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप व वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पीयनशीप टेस्ट कॉम्पिटीशन (प्री वर्ल्ड कप) स्पर्धा नुकतीच थायलंड येथे १ ते ७ मे दरम्यान झाली़ या स्पर्धेत भारतातून आप्पासाहेब ढुस व इंडिगो कंपनीतील वैमानिक पी़ आ़ सिंग (हैदराबाद) यांनी तर रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, कतार, थायलंड आदी देशांमधील ६७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता़ राहुरी येथील आप्पासाहेब ढुस यांनी प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात सुवर्णपदक पटकविले. या टास्कमध्ये ढुस यांनी एक तास २८ मिनिटे ३९ सेकंद इतकी वेळ नोंदवून सर्वाधिक वेळ हवेत तरंगण्याचा विक्रम केला़ तसेच ३५०० फूट उंचीवर उड्डाण घेत १८ गुण ढुस यांनी मिळविले़ तर दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या थायलंड येथील पायलट वोरावी विथायायारनोन याने एक तास १२ मिनिटे २८ सेकंद वेळ नोंदवून १३ गुणांची कमाई केली़ (वृत्तसंस्था)