खुद्द क्रीडामंत्र्यांनी केली स्वच्छतागृहाची सफाई

0
113

नवी दिल्ली, १८ मे 
क्रीडामंत्री विजय गोयल यांनी इंदिरा गांधी स्टेडियमला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहांची अचानक पाहणी केली तेव्हा ती अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसताच स्वतःच साफसफाईला सुरवात केली. कांही दिवसांपूर्वी येथे कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या व त्यात आंतरराष्ट्रीय पैलवानही सहभागी झाले होते. त्यावेळी स्वच्छतागृहे घाणेरडी असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत गोयल यांनी येथे भेट दिली तेव्हा स्वच्छतागृहांबाहेर टिश्यू पेपरचे बोळे पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरीत ते फाटके घाणेरडे टिश्यू उचलायला सुरवात केली व सोबत असलेल्या युवा क्रिकेटर्सना फरशी साफ करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी मुले व मुलींच्या हॉस्टेलचीही पाहणी केली. तसेच जिमनॅस्टिक हॉल, बॉक्सिंग हॉलची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, स्टेडियम स्वच्छतेची जबाबदारी खासगी संस्थेकडे दिली गेली आहे मात्र क्रीडा प्राधिकरण अधिकार्‌यांनी त्यावर लक्ष ठेवले पाहिजे व तशा सूचना त्यांना दिल्या गेल्या आहेत.