धोनी मैदानावर असेल तर असे होणारच ः पटेल

0
139

मुंबई, १८ मे 
आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायण्ट्‌सविरुद्ध अंतिम दोन षटकात ४१ धावांना मुकल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला, असे मत मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक पार्थिव पटेलने व्यक्त केले.
टी-२० मध्ये अशा तर्‍हेच्या गोष्टी घडू शकतात व त्यातही धोनी खेळत असेल तर. मात्र सामन्यावर आम्ही नियंत्रण राखले होते. या सामन्यात पराभव आम्हाला या दोन षटकांमुळेच मिळाला असे म्हणता येणार नाही, असेही तो म्हणाला.
धोनीने मिशेल मॅक्लेगन व जसप्रीत बुमराहच्या चेडूंवर पाच षटकार हाणले. पटेलने अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूवर यॉर्कर टाकण्याऐवजी आखुड टप्प्याचे चेंडू टाकल्याबद्दल बुमराहची पाठराखण केली. तो म्हणाला की, जर तुम्ही सामन्यातील अखेरची दोन षटके बघितली किंवा गतवर्षीची प्रदर्शन बघितले तर तो धोनीविरुद्ध यशस्वी ठरला आहे. तो स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी करीत आहे व तो निश्‍चितरूपाने उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु कधीकधी तुम्हाला फलंदाजांनासुद्धा श्रेय द्यायला पाहिजे. (वृत्तसंस्था)