दीपिका ‘कान’ महोत्सवासाठी सज्ज

0
149

नवी दिल्ली : दीपिका पदुकोणने ‘कान’ महोत्सवाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या महोत्सवातील दीपिकाचे फोटो आता व्हायरलही झाले आहेत. दीपिकाचे हे फोटो पाहून तिचा रेड कार्पेटवरचा जलवा पाहायला तिचे चाहते उत्सुक आहेत. दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या कान महोत्सवाच्या पूर्वतयारीचे फोटो शेअर केले आहेत. यात दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हाच ड्रेस तिने ‘कान’ महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत घातला होता. एका सौंदर्य प्रसाधन कंपनीची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून दीपिका पहिल्यांदा ‘कान’ महोत्सवात गेली आहे. कान महोत्सवर १७ मे ते २८ मेपर्यंत सुरू असणार आहे.