‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे चित्रीकरण लवकरच

0
150

मुंबई : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या १ जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्स निर्मित आणि विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन, ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमिर खान, कॅटरिना कैफ आणि ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अमिताभ आणि आमिर हे दोघेजण पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असून, सगळ्यांसाठीच ही एक आनंदाची पर्वणीच असणार आहे.