ऍक्सिस बँकेकडून गृहकर्जदरात मोठी कपात

0
62

मुंबई, १८ मे 
ऍक्सिस बँकेने गृहकर्जात तब्बल ०.३० टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. नवे दर १६ मेपासून लागू झाले आहेत. तीस लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणार्‍या पगारदार व्यक्तींना ८.३५ टक्के दराने कर्ज मिळणार आहे. परंतु बँकेकडून महिलांसाठी वेगळा असा व्याजाचा दर जाहीर करण्यात आलेला नाही.
स्टेट बँकेने देखील गेल्या आठवड्यात तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्क्यापर्यंत कमी केले असून, महिलांसाठीही ८.३५ टक्के दराने कर्ज देण्याची घोषणा केली होती. तर खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने महिलांसाठी ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर ८.६५ टक्के व्याजदर देण्याची घोषणा केली होती. साधारण वर्गासाठी ८.७ टक्के व्याजदर लागू करण्याचा निर्णय घेतला होता.