बुलेट ट्रेेनच्या दारात बोट अडकते तेव्हा…

0
219

जियांग्सू (चीन), १८ मे 
चालत्या रेल्वेतून उतरू नका किंवा चढू नका अशा सूचना नेहमीच आपल्या कानावर येतात.या सूचनांकडे दुर्लक्ष करून केल्याने काय होऊ शकते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चीनमधील जियांग्सू येथील रेल्वे स्थानकात एका व्यक्तीचे बोट बुलेट ट्रेनच्या दारात अडकले. त्यानंतर रेल्वे सुरू झाल्याने त्याला रेल्वेसोबत वेगाने पळत जावे लागले. ही घटना घडत असताना फलाटावरील प्रवाशांनी रेल्वे थांबवण्यासाठी चालकास हातवारे केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्थात रेल्वेचा वेग प्रचंड वाढण्याआधी त्या व्यक्तीला अडकलेले बोट सोडवण्यात यश आले. काही सेंकदाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
या व्यक्तीचे बोट तुटले नाही अथवा ती व्यक्ती गाडीसोबत फरफटत गेली नाही, यासाठी देवाचेच आभार मानायला हवेत.घ (वृत्तसंस्था)