ईव्हीएम आव्हानाकरिता आयोग सज्ज

0
77

आज होणार औपचारिक घोषणा
नवी दिल्ली, १९ मे
ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स अर्थात ईव्हीएमवर अनेक राजकीय पक्षांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ईव्हीएमची जाहीर चाचणी घेण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झाला आहे. राजकीय पक्षांना त्यांचे कौशल्य आजमावता यावे, यासाठी आयोग उद्या शनिवारी औपचारिक कार्यक्रमाची घोषणा करणार आहे.
ईव्हीएममध्ये गडबड केली जाऊ शकते, असा दावा काही राजकीय पक्षांनी केला असल्याने आम्ही त्यांना त्यांचे कौशल्य आजमावण्याची संधी देणार आहोत. उद्या याबाबत घोषणा केली जाईल, असे आयोगाच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अलीकडेच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये भाजपालाच मते मिळतील, अशा प्रकारे गडबड करण्यात आली होती, असा दावा १२ मे रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काही राजकीय पक्षांनी केला होता. त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त नझिम झैदी यांनी या पक्षांना खुले आव्हान दिले होते. (वृत्तसंस्था)