सेहवागचे पाकिस्तानी नागरिकाला चोख उत्तर!

0
136

मुंबई, १९ मे 
अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असा निर्णय देत आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला झटका दिला आहे.आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालानंतर देशभरातून सोशल मीडियावर मतं व्यक्त केली जात आहे. याबाबतच भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट केले. पण त्याच्या ट्वीटनंतर एका पाकिस्तानी नागरिकानं भारतीय नागरिक आणि कुलभूषणबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर सेहवागनं त्याच्या स्टाईलमध्ये त्या पाकिस्तानी नागरिकाला उत्तर दिले.
संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणारा पाकिस्तानी नागरिक फरहान जाहूरने एक ट्वीट केले, ’तुम्हाला अक्कल कमी आहे? कुलभूषणबाबत अंतिम फैसला येणे बाकी आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जा आम्ही त्याला नक्की फाशीची शिक्षा देऊ. त्याच्या या ट्वीटला सेहवागनेही त्याच भाषेत उत्तर दिले. ’वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करु हे फक्त तुम्ही स्वप्नच पाहाता. कुत्ता पालो, बिल्ली पालो, गलतफहमी मत पालो, असे वीरूने चोख प्रत्युत्तर दिले. मैदानावर स्फोटक फलंदाजी करणारा वीरु ट्वीटरच्या मैदानातही अनेकांची पळताभुई थोडी करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. घ(वृत्तसंस्था)
कैफच्या सडेतोड उत्तराने टीकाकारांचे तोंड बंद!
मुंबई : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर भारताच्या अनेक बड्या असामींनी आनंद व्यक्त केला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही याबाबत भारताचे अभिनंदन केले.
कैफच्या ट्वीटनंतर पाकिस्तानमधील अनेक ट्विटराईट्सने ट्रोल केले. मात्र मोहम्मद कैफनेही चोख प्रत्युत्तर देत त्यांचे तोंड बंद केले.
अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली. भारताचे अभिनंदन, आंतरराष्ट्रीय न्यायालायाचे आभार. सत्याचा विजय झाला, असे कैफने ट्वीटमध्ये म्हटले.
मोहम्मद कैफचे हे ट्वीट पाकिस्तानच्या एका ट्विपलच्या फारच मनाला लागले. आमिर अक्रम नावाच्या यूझरने कैफच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना नावातून मोहम्मद शब्द हटवण्यास सांगितले. यावर कैफनेही चोख प्रत्युत्तर दिले. जर मी भारताच्या विजयाचे समर्थन केले म्हणून माझ्या नावातून मोहम्मद हटवायला हवे? मला माझ्या नावावर अभिमान आहे. आमीरचा अर्थ आहे, जीवनात परिपूर्ण. तुलाही त्याची गरज आहे, असे तो म्हणाला.