न्यूझीलंडमध्ये चौथ्या सामन्यातही पराभव

0
121

प्यूककोहे, १९ मे
पाच आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांच्या मालिकेत सलग चौथ्या सामन्यातही न्यूझीलंड संघाने भारताला सरळ ३-० ने मात दिली. रोजा बिच पार्क येथे रंगलेल्या चौथ्या सामन्यात विजय नोंदवून कसोटी हॉकी मालिकेत ४-० ने विजयी आघाडी मिळवली आहे.
गत तीन सामन्यात भारतीय संघाला मात देणार्‍या न्यूझीलंड संघाने या सामन्याची सुरुवातसुद्धा सकारात्मक रूपात केली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस शेवटच्या मिनिटात रेचेल मॅककानने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवून न्यूझीलंडला खाते उघडून दिले. त्यानंतर दोन मिनिटांनीच टेस्सा जोपने पेनॉल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून यजमान संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये अखेरच्या समयी २६ व्या मिनिटात मॅककानने आणखी एका गोलची भर घालून न्यूझीलंडला भारताविरुद्ध ३-० गोलने भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उर्वरित दोन क्वॉर्टरमध्ये न्यूझीलंडने आपल्या मजबूत संरक्षणफळीच्या जोरावर भारताला गोल नोंदविण्याची संधीच दिली नाही.
अखेर न्यूझीलंडने ३-० गोलने विजय सुनिश्‍चित केला. पाचवा व अखेरचा कसोटी सामना २० मे रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)