घरफोडी करणारी टोळी जेरबंद

संस्कृत भारतीच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप

0
135

गडचिरोली, ५ जून 
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिसांनी घरफोडी करणार्‍या टोळीला सोमवार, ५ जूनला जेरबंद केले.
घरफोडी झाल्याबाबत १९ मे रोजी गडचिराली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पथक तयार करून तपासचक्रे वेगाने फिरविण्यात आली. दरम्यान, घरफोडी करणार्‍या टोळीतील सराईत गुन्हेगार रामू वेलु स्वामी, एमला मोतीयन कोरीयन, कमलेश उर्फ अलसु रामसंजीवन निसाद यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांच्या अटकेमुळे घरफोडी करणार्‍या इतर गुन्हेगारांचा शोध लागण्यास मदत होणार आहे.
सदर कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुनील इंगळे, पोलिस हवालदार दुर्गे, पोलिस शिपाई पातकमवार, महिला पोलिस शिपाई गायत्री, गडचिरोली ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान भुयारकर, सहायक फौजदार दुग्गा, पोलिस हवालदार जनबंधू यांनी बजावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यवान भुयारकर करीत आहेत.