साप्ताहिक राशिभविष्य

0
497

रविवार, ११ ते १७ जून २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, १२ जून- भद्रा ( १२.१४ ते २५.१५); मंगळवार, १३ जून- संकष्ट चतुर्थी, अंगारक योग (चंद्रोदय रात्री १०.०१), बुधाचा पूर्वेस अस्त; बुधवार, १४ जून- रवि मिथुन राशीत (२९.३३); गुरुवार, १५ जून- (प्रारंभ २९.०६), श्री गोविंद महाराज पुण्यतिथी- सोनगीर (धुळे); शुक्रवार, १६ जून- भद्रा (समाप्त १७.०९), नेपच्यून वक्री, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान- देह; शनिवार, १७ जून- कालाष्टमी, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान- आळंदी.
संक्षिप्त मुहूर्त ः साखरपुडा-१३,१५,१७ जून, बारसे- ११,१३,१५ जून, जावळे- १५ जून, गृहप्रवेश- १५ जून.
मेष- सवयींबाबत जागरूक असावे
या आठवड्यात आपला राशीस्वामी मंगळ अस्तंगत आहे. त्यामुळे आपणास रासीस्वामीचे बळ प्राप्त होणे जरा दुरापास्त आहे आणि अशातच राशीत असलेले शुक्र आणि हर्शल काही विपरीत तर करणार नाहीत ना याची काळजी आपणास घ्यावयास हवी. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींबाबत जागरूक रहावयास हवे. व्यसने असणार्‍यांनी काळजी घ्यावी. या राशीच्या तरुण वर्गास जीवनाचा जोडीदार शोधण्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. पसंतीचा जोडीदार मिळावा, तसेच काही नवदाम्पत्यांना संततीसाठी अनुकूल योग लाभू शकतात. राशीत असलेला शुक्र मोठ्या खरेदीचे योग देखील आणू शकतो. यामुळे कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. दरम्यान, शनि व मंगळाचा प्रतियोग होत असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने सावकाश व सांभाळून चालावावीत.
शुभ दिनांक-११,१२,१५,१६.
वृषभ- अनावश्यक खर्च टाळावा
आपला राशीस्वामी शुक्र हर्शलसोबत व्यय स्थानात आहे आणि व्ययेश मंगळ धनस्थानात अस्तंगत आहे. ही ग्रहस्थिती आर्थिक दिग्मूढता निर्माण करू शकते. त्यामुळे या आठवड्यात आर्थिक व्यवहारात अतिशय सावध असावे. अनावश्यक खर्च टाळावा. कोणावरही विश्‍वास टाकून आर्थिक व्यवहार करू नयेत. पैसे सांभाळून ठेवावयास हवेत. खरेदी करताना तारतम्य असावे. आपल्या खर्चिक प्रवृत्तीमुळे आपल्याभोवतीचे कोंडाळे वाढलेले राहील. व्यवसायात नवी गुंतवणूक, व्यवसाय विस्तार याबाबतचे निर्णय घेताना सावध असावे. तूर्त काही दिवस यासंबंधातील निर्णय बाजूला ठेवणे जास्त श्रेयस्कर राहील. नोकरीत लगेच कोणता मोठा लाभ दिसणार नसला तरी या काळातील कामाचे दूरगामी लाभ नक्कीच मिळू शकतात. या राशीच्या काही युवकांना लवकरच विवाह योग लाभावेत. परिवारात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक-१४,१५,१६,१७.
मिथुन- धोक्यांपासून सावध असावे
आपला राशीस्वामी बुध या आठवड्याच्या मध्यात अस्तंगत होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात सुरुवातीला उत्तम व उत्तरार्धात काहीशी मन खट्टू करणारी फले मिळण्याची शक्यता आहे. त्यातच बुध व्ययात असल्यामुळे तो प्रकृती आणि खर्चवाढ हा अनुषंगाने जरा त्रासदायक ठरू शकतो. राशीतला मंगळ काही बाबतीत आपणांस उतावळा करीत असला तरी सर्वच संधी आपल्याला लाभकारक नसणार. शेअर बाजार, सट्टेबाजार, वायदे बाजाराशी संलग्न असलेल्या व्यक्तींना या सार्‍या घडामोडींना अचानक व झटपट प्रक्रियेचे स्वरूप मिळत असल्याचा अनुभव येऊ शकतो, मात्र मंगळावर सप्तमातून शनिने दृष्टी ठेवून प्रतियोगही साधला आहे, त्यामुळे सारे व्यवहार करताना, मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करीत असताना पुरेसी काळजी व सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
शुभ दिनांक-११,१२,१५,१७.
कर्क- वागण्यावर नियंत्रण हवे
आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी चंद्र षष्ठस्थानात शनिसोबत सोबत असून व्यय स्थानातून त्याचा मंगळाशी प्रतियोग होत आहे. हा प्रतियोग फारसा शुभदायक नाही. आठवड्याच्या पूर्वार्धात चंद्र नोकरी-व्यवसायात आपले महत्त्व वाढवू शकतो. तो आपल्या योजनांना यशही प्रदान करू शकतो. काही धाडसी पावले उचलण्याचेही बळ मिळू शकेल. मात्र त्याचवेळी आपणास स्वतःच्या स्वभावावर, वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आपल्या वागण्याने, बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मंगळ व शनिचा प्रतियोग आपणास आरोग्याची काळजी घेण्यास सुचवीत आहेत. वाहने सावकाश व सांभाळून चालावावीत. अपघाताच्या शक्यता टाळावयास हव्यात. कुटुंबातील कुणाच्या प्रकृतीच्या कारणामुळे देखील अचानक धावपळ करावी लागू शकते.
शुभ दिनांक-११,१२,१३,१४.
सिंह- कामे लांबणीवर पडणार
आपला राशीस्वामी रवि सुरुवातीला दशम स्थानात बुधासोबत आहे. बुध अस्तंगत आहे. आठवड्याच्या मध्यात रवि राश्यंतर करून लाभात येईल मात्र येथे त्याची सोबत अस्तंगत मंगळ करणार असल्याने हा आठवडा आपणांस विशेष किंवा उत्कंठावर्धक जाण्याची संभावना कमीच आहे. राशीतला राहूपण त्यासाठी काही अंशी जबाबदार राहील. आपल्या योजना व विचाराधीन कामें लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. धनस्थानातला गुरु आर्थिक आवक मात्र सुरळीत ठेवू शकतो. त्यामुळे त्याचे मानसिक समाधान आपणास मिळेल. दरम्यान. शनि आणि मंगळाचा प्रतियोग आहे. तो संततीविषयक काही प्रश्‍न निर्माण करू शकतो. यावरून कुटुंबांमध्ये काही पेचप्रसंगही निर्माण होऊ शकतात. आपणास आरोग्याची काळजी घ्यावयास हवी. वाहने काळजीपूर्वक चालावावीत. वेगावर नियंत्रण हवे.
शुभ दिनांक- ११,१५,१६,१७.
कन्या- प्राधान्यक्रम बदलावा लागेल
आपला राशीस्वामी बुध या आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानात रविच्या सान्निध्यात असून त्याच्यावर गुरुची दृष्टी देखील आहे. मात्र आठवड्याच्या मध्यात बुध अस्तंगत होणार आहे. त्यामुळे हा आठवडा काहीसा संमिश्र असणार आहे. व्यावसायिक यशाच्या संबंधाने एखादा चांगला योग सुरुवातीस लाभून तो आपणास आनंद व उत्साह देणारा ठरेल. मात्र उत्तरार्धात काही पेच निर्माण होऊन आपल्या धोरणात, व्यवहारात वारंवार, परिस्थितीनुरूप बदल करावा लागू शकतो. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम देखील बदलावा लागू शकतो. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे गंभीर आजारपण उद्भवून त्यात आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडू शकतात. कामें विलंबाने होत असलेली पाहून मन:स्ताप होईल. कारखान्यातील यंत्रसामग्री किंवा व्यावसायिक वाहनाच्या वारंवारच्या बिघाडामुळेही आपण त्रस्त होऊ शकता.
शुभ दिनांक- १३,१४,१६,१७.
तुला- प्रयत्न वाढविण्याची गरज
आपला राशीस्वामी शुक्र सप्तमात हर्शलसोबत आहे व शुक्राचा घरमालक मंगळ भाग्यात असून अस्तंगत आहे. यामुळे मधल्या काही काळात अनुभवलेल्या आनंद, उत्साह व यशदायक योगांचा वेग आता काही काळ मंदावण्याची शक्यता आहे. होऊ घातलेली कामे अचानक लांबणीवर पडतील. हातची कामें बारगळू शकतात. त्यामुळे निराश न होता या आठवड्यात आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देण्याची गरज आहे. यामुळे हा काळ आपणास अतिशय कार्यमग्नतेचा आणि धावपळीचा जाऊ शकतो. अशातच आपणास प्रकृती जपणे आवश्यक आहे. अष्टम स्थानात असलेला रवि हाडे व स्नायूंशी संबंधित दुखणी निर्माण करू शकतो. तसेच शनि-मंगळाचा प्रतियोग एखादे जुने दुखणे अचानक डोके वर काढण्यास कारणीभूत ठरू शकेल. त्यामुळे वेळीच औषधोपचार घेऊन आरोग्य राखावे.
शुभ दिनांक- १४,१५,१६,१७.
वृश्‍चिक- सावध राहण्याचा इशारा
आपला राशीस्वामी मंगळ या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम या पीडादायक स्थानात असून तो अस्तंगत आहे. भरीसभर म्हणजे त्याचा शत्रू शनि प्रतियोगही करीत आहे. हा काळ आपणास व्यवसाय, नोकरी व प्रकृतीसह सार्‍याच बाबतीत अत्यंत सावध राहण्याचा इशारा देत आहे. याकाळात केलेली एखादी गुंतवणूक फसवी ठरून देखील पैसा अडकून राहू शकतो. कुंटुंबात एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी आपणास उचलावी लागू शकते. नोकरीत असणार्‍यांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध असावे. प्रलोभनांपासून दूर राहावयास हवे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यसनांवर नियंत्रण हवे. शनि-मंगळ प्रतियोग काही जुनी दुखणी वाढवू शकतो. वाहने सावकाश व सांभाळून चालावावीत. अपघाताच्या शक्यता टाळावयास हव्यात. कुटुंबातील कुणाच्या प्रकृतीच्या कारणामुळे धावपळ करावी लागू शकते.
शुभ दिनांक- ११,१३,१५,१६.
धनु- प्रतीक्षा करावी लागणार
आपला राशीस्वामी गुरु सध्या दशम स्थानात असून चंद्र आठवड्याची सुरुवात आपल्या राशीतूनच करीत आहे. खरे तर हा आनंदयोग ठरावयास हवा होता, परंतु आपल्याला या आठवड्यात तरी यशासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उत्तरार्धात काहीसे निराशेचे प्रसंग देखील निर्माण होऊ शकतात मात्र शुक्राचा चंद्रासोबतचा योग आपणास धीर देऊ शकेल. आठवड्याच्या मध्यापासून मात्र आपल्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. आठवड्याच्या शेवटी शेवटी जरा दिलासा मिळून नवीन व्यावसायिक करार, नव्या ओळखी, मान्यवरांच्या भेटीगाठी पोषक ठरतील. अगोदरपासून नोकरी किंवा व्यवसायात असणार्‍यांना काही बदल करावयाची इच्छा असल्यास या संधीचा लाभ घेता येईल. वाहने सांभाळून चालवावीत. अपघातांबाबत सावध असावे.
शुभ दिनांक- ११,१२,१३,१७.
मकर- कुसंगती टाळावयास हवी
आपला राशीस्वामी शनि व्ययस्थानात असून या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रासोबत आहे. शनि व सप्तमातून मंगळाचा प्रतियोग सुरू आहे. हे योग पाहता या आठवड्यात आपल्याला विशेषत्वाने प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. हा प्रतियोग आरोग्याच्या दृष्टीने फारसा हितावह नाही. तो आपणास शारीरिक दुखापतींेपासून जपण्याचा इशारा देत आहे. या काळात वाहने सांभाळून चालवावयास हवीत. विशेषतः वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावयास हवे. कोणतेही धाडस, कोणताही प्रयोग अंगलट येऊन अपघातास आमंत्रण ठरू शकते. त्याचप्रमाणे विजेच्या व आगीच्या उपकरणांचा वापर करताना पुरेशी खबरदारी घ्यावयास हवी. वादविवाद, भांडणे यासारख्या घटनांपासून दूर राहणेच बरे. आपल्या भोवतालच्या व्यक्तींची खात्री करूनच त्यांना जवळ करा.
शुभ दिनांक- १३,१४,१५,१६.
कुंभ- मुलांच्या प्रगतीने आनंद
या आठवड्याच्या आरंभी आपला राशीस्वामी शनि चंद्रासोबत लाभस्थानात असून केतूने राशीस्थानात मांड ठोकलेली आहे. याशिवाय शनिचा पंचमातील मंगळाशी प्रतियोग झालेला आहे. हे पाहता आपणास हा आठवडा संमिश्र स्वरूपाची फले देणार असल्याचे दिसते. पूर्वार्धात मनास आनंद व समाधान देणार्‍या काही घटना घडताना दिसतील. विशेषतः मुलांच्या परीक्षांचे निकाल आपणास हर्षित करतील. मुलांची होत असलेली प्रगती पाहून आपले मन आनंदेल. मुलांना व्यावसायिक यश मिळू शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र आर्थिक व्यवहारात अतिशय सावध रहावयास हवे.फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारात काळजीपूर्वक करावेत. शनि-मंगळा प्रतियोगामुळे अपघाताबाबतही सावध असावे. वाहने सांभाळून चालवावीत.
शुभ दिनांक- ११,१५,१६,१७.
मीन- तणाव, कटकटीचे वातावरण
आपला राशीस्वामी गुरु सप्तमस्थानातून आपल्या राशीला बळ देत आहे, तर आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र शनिसोबत दशमात आहे. शनि व मंगळाचा उपद्रवकारी प्रतियोग सुखस्थानातून होत आहे. हे सारे पाहता व्यावसायिक व कौटुंबिकस्तरावर पुढले काही दिवस जरा तणावाचे राहू शकतात, असे दिसते. कुटुंबात काही वादविवाद, मतभेद निर्माण होत असतील तर ते वेळीच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करावेत. कौटुंबिक वाद जास्त चिघळू नयेत. नोकरी-व्यवसायात काहीसे कटकटीचे वातावरण राहील. त्यामुळे कोणतेही नवे पाऊल उचलताना पुरेशी सावधगिरी बाळगावी. सुदैवाने आर्थिक स्थिती मजबूत राहील. दरम्यान, शनि-मंगळाच्या प्रतियोगामुळे आरोग्यावर बेतेल असा कोणताही धोका पत्करू नये. वाहने सावधपणे चालवावीत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
शुभ दिनांक- १२,१३,१४,१७.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६