सुसह्य करू या म्हातारपण!

0
226

‘‘भगवान देेता है, तो छप्पर फाड के देता है|’’
‘‘घेशील किती दो करांनी.’’ ‘‘न मागे तयाची रमा होय दासी.’’ या सगळ्यांचा मला आता अनुभव येतोय्. तसंच ‘‘भगवान के घर देर है, पर अंधेर नही है|’’ हे तर मला खूप खूप पटलंय्, अन् माज्या बाबतीत तर, हे देरचं तंतोतंत लागू पडतय्. अहो मला जे जे हवं होतं, ते ते सगळं मला मिळतंय् आपोआप. निसर्गदत्तच म्हणा ना. आता सांगूनच टाकते. उगाचच नमलाच नको घडाभर तेल.
‘‘म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण’’ म्हणतात ना ते अगदी बरोब्बर अचूक आहे हो. म्हणजे म्हातारपणी बाळपणाचा सुखाचा काळ अनुभवायचा. आता माझंच पहा. लहानपणी मला खूप खूप काही बाही हवसं वाटायचं, अन् मिळालं नाही की, निराश व्हायचं. असे नेहमीच ठरलेलं. मग गाल फुरगटून बसायचं. मला का मिळत नाही. जे जे मनी वसतं ते ते. आता बघा, वाडा पद्धत आता तर बादच झालीय. पण आमच्या लहानपणी ती होती. अन् आम्हाला ती खूप खूब भावायची.खू मजा यायची. वाड्यात कोणाकडचं काही कार्य असलं की, वाड्यातल्या सगळ्यांच्याच घरचं कार्य होऊन जायचं. लहानांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच खपत. हळदीकुुंकवाची तर मोठ्ठी यादी असायची. चाललो आम्ही बोलावणी करायला. तेव्हा, ‘‘माझ्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही का काम सांगितलं?’’ वगैरे नसायचं. प्रत्येक लहान बालक प्रत्येकाच्या हक्काचं असायचं. दुपारी सगळी कामं आटोपली की जमायच्या हक्काचं असायचं. दुपारी सगळी कामं आटोपली की जमायच्या सगळ्या आज्या अन् सुना एकत्र. आज्या तेलवाती-फुलवाती करायच्या तर सुना निवडण शिवण टिपण. कामाबरोबर गप्पा गोष्टी आठवणी काढणं थट्टा करणं चालायचं. आम्ही तिथेच खेळत असायचो. कधी कधी त्यांच्यामध्ये जाऊन बसाायचो. कधी कधी आज्यांची आम्ही मुलांमध्ये तुलना व्हायची. ही चांगली, ती वांगली. ही हवीशी, ती नकुशी. माझं कपाळ लहान मी कमनशिबी. अरुणाच कपाळ मोठं म्हणून ती नशिबवान भाग्यवान असं म्हणायच्या. कपाळावर हाताची चारही बोटं बरोबर बसली की, भाग्यवान-कमनशिबी असं त्या ठरवायच्या. माझ्या हाताची चारबोटं ंकाही त्यांच्या अंदाजाप्राणे माझ्या कपाळावर चपखलक बसत नव्हती म्हणून मी कमनशिबी. मला खूप वाईट वाटायचं, मी भाग्यवान नाही म्हणून. मग मी कपाळ मोठं दिसण्याकरता खूप वरून केसाची वळण घ्यायची. माझं कपाळ किंचित मोठं दिसायचं. मग मी खूप हरखून जायची भाग्यवान म्हणून. आता या वयात तर केसच गायब होऊ लागले.माझं कपाळ इतकं मोठ्ठ दिसतंय की, हाताची चारच काय आठही बोटं मावतील म्हणजे मी डब्बल भाग्यवान झालेय् म्हणायला हरकत नाही. म्हणजे बालपणी न मिळालेलं सुख मी आता या वयात भोगतेय.
दुसरं लहानपणचं माझं अधुरं राहिलेलं स्वप्न आता म्हातारपणी मला भोगायला मिळतय्. माझे दात म्हणजे खेबडखाबड वाकड्यातिकड्या भोपळ्याया बिया. लपवू म्हटलं तरी लपवू शकत नव्हते.तेव्हा वाकडे दात सरळ करण्याचा शोधही नव्हता की, काय न कळे.शोध असता तरी ‘‘देवानं जे दिलं ते गोडं मानावं.’’ अशा वृत्तीचे सगळे ज्येष्ठ. मला तर कुंदकळ्या सारख्या दातांची खूप हौस. ती हौस आता म्हातारपणी भोगतेय. काही दात पडले काही उपटले त्यामुळे झालं तोंडाचं बोळकं. मग नवीन कवळी एक सारख्या पांढर्‍या शुभ्र दंतपंक्तीची लावली. अन् कुंदकळ्या सारख्या दातांची हौस भागवली. म्हणजे, भगवान के घर देर है पूर्णपणे मला पटलंय्.
आता बघा मला की नाही गालावरची खळी खूप खूप आवडायची. शाळेत तिसरी का चवथीत नक्की आठवत नाही. पण ‘‘लाट उसळोनी जळी खळे व्हावे| तसे गाली हासता तुझ्या व्हावे.’’ अशा खळीच्या वर्णनाची कविता होती. कवीनी गालावरच्या खळीचं अप्रतीम वर्णन केलं. गालावरची खळी म्हणजे खळीच. तिची तुलनाच होऊ शकत नाही. खळी म्हणजे अप्रतीम सौंदर्य. बसकं नाक काळा सावळा रंग बारके डोळे असं सर्वसाधारण रूपही जिलन जात गालावरच्या खळीत. दोन्ही गालावर जर खळी पडत असेल तर विचारूच नका, ते सौंदर्याच रूप. मला एकदम दोन गालावरच्या खळीची नाही पण कमीत कमी एका गालावर तरी खळी पडायला हवी होती. कारण माझी बेबी मावशी पुष्पा मावशी अन् मनू मावशी यांच्या गालावर खळी पडायची. अजूनही पडते. इतक्या गोड दिसायच्या त्या हसताना. तेव्हा माझ्या गालावर खळी का पडत नाही म्हणून वाईट वाटे. मगक मी गालावर कृत्रिम खळी पाडून घ्यायचा प्रयत्न करायची. खिळा घेऊन गालावर करकचून दाबून गोर फिरवायची. खिळा काढल्याबरोबर धावत जाऊन आरशात पाहायची.दाबलेल्या ठिकाणी खिळ्याचा गोल ठसा उमटलेला दिसे.अन् मी मनाशी हसे. पण ते हे लगेच जिरे, कारण खिळ्याचा ठसा लगेच नामशेष झालेला असे. लहानपणीची खळीी आस. आता या उतारवयात झाली पूर्णत्वास. कारण दंताजीचे ठाणे उठल्यामुळे दोन्ही गालात खळी म्हणण्यापेक्षा खळा किंवा खळं म्हणणं योग्य ठरेल कारण हारण दोन्ही गालांचे खड्डे एकही दात नसल्यामुळे खूपच खोल म्हणजे २५-३० खळ्या त्यात मावतील एवढे मोठे. मग त्यांना खळी कसं म्हणायचं? शुभ्र दंत पंक्ती बसवल्या की खड्डे जातात गालांचे. पण त्या पंक्तींना खू हजार मोजावे लागले म्हणून मी त्या जास्त वापरत नाही. साड्यांच्या सेलला जाताना, भीशीच्या पार्टीला जातांना, फंक्शनला जातांना वापरते. बाहेर जायच्या साड्या जशा ठेवणील्या असतात. जपून वापरल्या जातात. तशी मी माझी मूल्यवान कवळी वापरते. त्यामुळे कुंदकळ्या दातांची अन् गालावरच्या खळीची हौस भागवल्या जाते. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मी साधू घेतले की नाही.
कॉलेजमध्ये असताना ‘पोनीटेल’ची खूपच फॅशन होती. पुष्कळ मुलींनी माझ्या मैत्रिणींनी ‘पोनीटेल’ करता केस कापून घेतले होते. इकडून तिकडे अन् इकडून तिकडे मान फिरवली की, पोनीटेल खूप सुंदर हाले. मोठी छान दिसे ती पोनीटेल मला फार आवडली ती. तसं बोलूनही दाखवलं घरात.पण आजी आणि पंजी यांच्या रक्त ताकीदीमुळे पोनीटेलची इच्छा दाबून टाकली मनात ‘केसाला कात्री लावायची नाही दळभद्र लक्षण ते,’ ऐकल्यावर मूग गिळावेच लागले मग. पण आता तरुणपणातला ‘केशसंभार’ पार रसातळाला गेला. त्यामुळे धड वेणी घालता येत नाही की, धड आंबाडाही पडत नाही. धड वीतभरही केस नाहीत आता. मग जेवढे आहेत तेवढच चिमटीत पकडून रबर लावल्यावर अगदी इवलीशी पोनीटेल होते. बरं तिला हालवायला इकडून तिकडे मानही हालवावी लागत नाही. ती आपोआपच खलखल हालते. अर्थातच त्यामुळे पोनीटेल सतत हालत असे. अशी माझ पोनीटेलची हौस या वयात पूर्ण झालीय्.
तसंच कानातले ‘डूल’ आता इयरिंग्ज म्हणतात. मला लोंबणारे कानातले खूप आवडायचे. पण आजी-पंजीच्या धाकात माझीत हौस पूर्ण झालीच नाही. त्यांचं म्हणणं, ‘‘लोंबते डूल सिनेमातल्या नट्याच घालतात. नट्यांची थेर आपल्या घरात चालणार नाहीत.’’ या वॉर्निंगमुळे लोंबत्या डुलांच्या इच्छेवर लगाम लावावाच लागला. पण आता मात्र तो लगाम आपोआपच निघून गेला त्याचं काय इतकं म्हातारपण आलय् की, प्रत्येकच अवयव कंप पावतो. मग कानच का नाही? कानांची पाळ इतकी हालते, की साध्या कुड्या जरी घातल्या तरी त्या खल खल हालतात कंपामुळे. म्हणजे लोंबते कानातले घालायची इच्छा आता या उतार वयात न मागताच आपोआप भागवल्या जातेय की नाही, म्हणजे भगवान के घर दे है च प्रत्यंतर घडतंय् की नाही.
तसंच गॉगल घालायची माझी हौस मध्यंतरी दोन्ही डोळ्यातल्या मोतीबिंदूमुळे अन् डॉ. च्या मिस्टेकमुळे पूर्णपणे
भागली. काळा चष्मा-गॉगल मला फार आवडायचं.
माझ्या मैत्रिणी उन्हात जाताना डोळे खराब होऊ नये म्हणून गॉगल लावायच्या. वैजयंती माला गॉगल लावल्यावर किती छान दिसायची चित्रपटात. मला पण मोह व्हायचा गॉगल लावायचा पण आजी अन् पंजीच्या धाकात तो जिरूनच गेला. पण दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूमुळे एकेक महिना गॉगल (काळा चष्मा) लावायचाच. दिवसभराच काय चोवीस तासही त्याच्याशिवाय रहायचं नाही. याप्रमाणे दोन मोती बिंदूमुळे ३० अधिक ३० म्हणजे साठ दिवस एका डोळ्यात ऑपरेेशनमध्ये किंचित चूक झाली या डॉ. च्या मतामुळे ती चूक दुरुस्त झाल्यावर पुन्हा एक महिना काळा चष्मा सतत लावावा लागला. म्हणजे एकूण ९० दिवस काळ्या चष्म्याची अन् माझी गट्टी जमली होती. त्यामुळे गॉगल लावण्याची माझी हौस फिटली. पूर्णपणे या वयात.
अरुणा, आशा, मीरा, शालू या मैत्रिणी ‘गाऊन’ घालायच्या मला पण ‘गाऊन’ घालावासा वाटायचं. पण ‘गाऊन’ घातला की मड्डम होशील ‘इंग्रजी थेरं चालणार नाहीत’ या वॉर्निंगमुळे मी तर त्या काळात ‘गा’ अक्षरापासून सुरू होणारे शब्दच म्हणत नव्हते. ‘गाणं, गाजर-गाय-गाढवं, गाव आदी कारण ‘गाऊन’ शब्द म्हटल्याबरोबर एका गालावर पाच बोटं उमटली होती आजीची दुसर्‍यावर पंजीची. वयोमानानुसार साडी नेसणं ती सांभाळणं कटकटीचं वाटतंय्. त्यापेक्षा गाऊन किती सुटसुटीत. आता ज्या वॉर्निंगमुळे गाऊन घालयची इच्छा दबून गेली होती. ती आता म्हातारपणी आपोआप सहजासहजी पूर्ण होत आहे.
एकूण काय म्हातारपण म्हणजे लहानपणच्या पूर्ण न झालेल्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच म्हणा ना. मग त्याचा बाऊ कशाला करायचा. अशाच कल्पनाविश्‍वात रमून जायचं अन् सुसह्य करायचं म्हातारपण. म्हातारपणी आधी व्याधींना तोंड द्यावं लागतं. ओझं होऊन जगावं लागतं. त्यावर मात करायची, ते सुसह्य करायचं आपल्या आतल्या मनाशी संवाद साधून.
– अनुराधा मोहगावकर
०७१५२-२४१५९४