‘हसीना पारकर’चा टीझर प्रदर्शित

0
170

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’चा टीझर आऊट झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टरही काही दिवसांपूर्वीच लॉंच करण्यात आले होते. अपूर्वा लखियाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. मुंबईतील गुन्हेगारी वर्तुळातील हसीना पारकर हे चर्चित नाव होते. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडते आहे की, वास्तवातील भाऊ-बहीण चित्रपटातही भाऊ-बहिणीचा रोल साकारत आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर वेगवेगळ्या चार लुक्समध्ये झळकणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर टीनएजर ते एका मुलाची आई अशी बदलती भूमिका साकारणार आहे.