सुनील ग्रोवरने केले प्रेक्षकांना नाराज

0
223

मुंबई : नुकताच सोनी वाहिनीवर ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा दोन तासांचा विशेष कार्यक्रम प्रसारित झाला. या कार्यक्रमातून सुनील ग्रोवरकडून प्रेक्षकांना बर्‍याच अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता सुनीलकडून तेवढ्या प्रमाणात झाली नसल्याची सध्या चर्चा होत आहे. सुनील ग्रोवर व अली असगर कार्यक्रमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांसमोर आले. पण, त्यांच्या विनोदाने या वेळी तेवढी कमाल केली नाही. जेव्हा सुनील अमिताभ बच्चनच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला, तेव्हाही त्याच्या विनोदांमध्ये नावीन्य नव्हते. त्यामुळे त्याच्या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांची निराशा केली.