‘मॉम’साठी रेहमानने गायले गाणे

0
195

मुंबई : बॉलीवूडची मिस ‘हवा हवाई’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी हिच्या आगामी ‘मॉम’ या चित्रपटातील ‘ओ सोना तेरे लिये’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटातून सावत्र आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘मॉम’ चित्रपटाचे हे गाणे ‘फादर्स डे’च्या वातावरणात प्रदर्शित होणे हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल. ईर्शाद कामिल लिखित या गाण्याला ए.आर. रेहमानने संगीतबद्ध केले आहे. तर, रेहमान आणि साशा तिरुपती यांनी ते गायले आहे. रेहमानच्या आवाजातील आर्ततेमुळे गाण्याचे भाव अक्षरश: हृदयाचा ठाव घेत आहेत.