कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली

0
68

कोल्हापूर, २६ जून
शहरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे राजाराम बंधार्‍यावर पाणी आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुलावरून पाणी वाहत असूनही काही जण अतिउत्साह दाखवत आहेत. वाढलेल्या पाणी पातळीतूनच वाहतूक सुरू आहे. एवढ्या पाण्यातून वाहने चालविणे जिवावर बेतू शकते. मात्र, तरीही लोक या पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. राधानगर, दूधगंगा, कासारी, पाटगाव, कुंभी, कडवी, जांबरे कोदे अशा धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. परिणामी शहरातून जाणार्‍या पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. (वृत्तसंस्था)