मानुषी ‘फेमिना मिस इंडिया’

0
88

मुंबई, २६ जून
माजी मिस इंडिया प्रियदर्शनी चॅटर्जी हिने हरयाणाची मानुषी छिल्लर हिच्या डोक्यावर ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया’चा मुकुट चढवला. जम्मू-काश्मीरच्या सना दुआ हिने दुसरा तर, बिहारची प्रियांका कुमारीने तिसरा क्रमांक पटकावला. हा सोहळा मुंबईतील यशराज स्टुडियोमध्ये पार पडला.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असलेल्या मानुषीने यंदाचा मिस फोटोजेनिक ऍवॉर्डही जिंकला आहे. तसेच, यापूर्वी ‘मिस हरयाणा’चाही किताब पटकावला आहे. आता डिसेंबरमध्ये चीनमध्ये होणार्‍या मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत मानुषी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संदर्भात मानुषीने सांगितले की, ‘मिस इंडिया’ स्पर्धेच्या ३० दिवसांच्या काळात मनाशी एक ठाम संकल्प केला होता. मी हे जग बदलू शकते, या विश्‍वासाच्या बळावरच मी स्पर्धेत उतरले होते.
सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेता अर्जुन रामपाल, अभिषेक कपूर, विद्युत जामवाल, अभिनेत्री बिपाशा बसू आदींनी परीक्षकांची जबाबदारी सांभाळली. (वृत्तसंस्था)