जीएसटीमुळे शेअर बाजारात घसरण

0
97

मुंबई, २७ जून
येत्या १ जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होतो आहे. त्या पृष्ठभूमीवर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने मोठी घसरण झाली आहे. सध्या (१ वाजून ५० मिनिटे) मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २७४ अंशांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स सध्या ३०,८६४.३० पातळीवर आहे. २९ मे २०१७ नंतर प्रथमच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ३१ हजारांच्या खाली पोचला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९६ अंशांची घसरण झाली असून तो ९,४७९.३० अंशावर व्यवहार करतो आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात गेल, भारती एअरटेल, आयटीसी, आयओसी आणि भारती इन्फ्राटेल या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर बीपीसीएल, बँक ऑफ बडोदा, जी एंटरटेनमेंट, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स आणि एक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. (वृत्तसंस्था)