पंजाब नॅशनल बँकपंजाब नॅशनल बँक

0
135

रद्द करणार मेस्ट्रो डेबिट कार्ड
मुंबई, २ जुलै 
सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ‘मेस्ट्रो डेबिट कार्ड’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे याचा पीएनबीच्या एक लाखांहून अधिक ‘मेस्ट्रो डेबिट कार्ड’धारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व मेस्ट्रो डेबिट कार्डधारकांना आता आपले जुने मेस्ट्रो डेबिट कार्ड बदलून अधिक सुरक्षित असे ‘ईएमव्ही चिप’ असलेले कार्ड घ्यावे लागणार आहे.बँकेकडून जुने मेस्ट्रो डेबिट कार्ड बदलून ईएमव्ही चिप असलेले मेस्ट्रो डेबिट कार्ड बदलून मिळणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ‘मेस्ट्रो डेबिट कार्ड’ बंद करण्यात येणार असून त्यामुळे पीएनबीच्या कोणत्याही शाखेतून एक नवीन ईएमव्ही चिप आधारित डेबिट कार्ड घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकेला जुने ‘मेस्ट्रो डेबिट कार्ड’ वापरणारे १ लाख लोक आढळून आले असून, सध्या पीएनबीचे कार्ड वापरणार्‍यांची संख्या ५.६५ कोटी आहे. घ(वृत्तसंस्था)