पाच मिनिटांत मिळू शकते अंधांना दृष्टी!

0
219

काठमांडू, १० जुलै 
नेपाळमधील संदूक रूईत हे डॉक्टर अनेकांसाठी ‘गॉड ऑफ साईट’ आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत आतापर्यंत एक लाखापेक्षाही अधिक लोकांना दृष्टी दिली आहे. त्यासाठी ते एक खास प्रकारची उपचारपद्धती वापरतात. अवघ्या पाच मिनिटांत ही पद्धत वापरून ते अंधुक दृष्टी असणार्‍यांना चांगली दृष्टी देतात.
ज्यांच्या डोळ्यांमधील समस्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे असे रुग्ण त्यांच्याकडे येतात. यापैकी बहुतांश लोक पैशाअभावी उपचार करून घेता येत नसल्याने ते रूईत यांच्याकडे येतात. स्वतः डॉक्टरही अनेक दुर्गम भागात जाऊन लोकांवर उपचार करतात. त्यांच्या उपचारपद्धतीत ते सर्वात आधी रुग्णाच्या डोळ्यात छोटेसे छिद्र बनवतात. त्यानंतर दृष्टी अंधुक होण्यास जी कमजोर नस कारणीभूत ठरत आहे ती हटवून तिथे स्वस्त पण परिणामकारक अशी सिंथेटिक लेन्स बसवली जाते. अवघ्या पाच मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. गेल्या तीस वर्षांच्या काळात रूईत यांनी आशिया आणि आफ्रिकेतील अनेक मागासलेल्या भागात जाऊन  सेवा बजावली आहे. (वृत्तसंस्था)