ब्रिटनमध्ये ५००० वर्षांपूर्वीच्या दफनगुहा सापडल्या

0
182

लंडन, १४ जुलै 
ब्रिटनमध्ये तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच्या हाऊस ऑफ द डेडचा शोध लावण्यात आला असून, ब्रिटनमधील प्रागैतिहासिक काळातील स्टोनहेंज या दगडी रचनेच्या काळातील माणसांचे अवशेष याठिकाणी मिळून आले आहेत. त्या काळात स्टोनहेंज ही रचना तत्कालीन माणसाने खगोलीय अभ्यासाच्या हेतूने केली गेली होती, असे म्हटले जाते.
रीडिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कॅट्स ब्रेन या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी उत्खनन करून या स्टोनहेंजचा शोध लावला. त्या ठिकाणी इसवी सनापूर्वीच्या ३६०० या काळातील लोकांना दफन केले असावे, असे संशोधकांना वाटते. या ठिकाणाचा छडा सर्वप्रथम एका एरियल फोटोग्राफीमधून लागला गेला होता.
जिओफिजिकल सर्व्हे इमेजरीने त्याच्या प्रतिमा टिपल्या होत्या. त्याबाबत कुतूहल निर्माण होऊन तिथे उत्खनन व संशोधन केल्यावर तिथे एक दफनभूमी असल्याचे दिसून आले. स्टोनहेंजपासून जवळच असलेल्या एका शेतात हे ठिकाण होते. (वृत्तसंस्था)