फेसबूक-बहाद्दर भारतात सर्वाधिक  

0
220

कॅलिफोर्निया, १४ जुलै 
फेसबूक वापरणार्‍या भारतीयांची आता तब्बल २४.१ कोटी इतकी झाल्याची माहिती फेसबूककडून देण्यात आली आहे. ही संख्या जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेमध्ये फेसबूक वापरणार्‍यांची संख्या २४ कोटी आहे, तर जगातील फेसबूक युजर्सची एकूण संख्या २ अब्ज इतकी आहे.
भारतामधील फेसबूक युजर्सची संख्या वाढण्याचा वेग अमेरिकेपेक्षा दुपटीहूनही अधिक असल्याचेही या अध्ययनात स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन फेसबूक युजर्सची संख्या १२ टक्क्यांनी वाढली असून, याच काळात भारतीय युजर्सची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतात फेसबूक युजर्सपैकी दोन तृतीयांश युजर्स पुरुष असल्याचेही यात निष्पन्न झाले आहेण तर अमेरिकेमधील एकूण फेसबूक युजर्सपैकी ५४ टक्के महिला आहेत. विशेष म्हणजे भारतातील फेसबूक युजर्सपैकी ५० टक्क्यांहूनही जास्त युजर्सचे वय २५ पेक्षा कमी आहे.
फेसबूक वापरणार्‍या भारतीय युजर्सची संख्येत लक्षणीय  वाढ झाली असली तरी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ १९ टक्के लोकसंख्या फेसबूक वापरत असल्याचेही गेल्या जूनमध्ये सिद्ध झाले होते. (वृत्तसंस्था)