इवलेसे घर, ज्याचे ढगाएवढे दर…

0
214

लंडन, १४ जुलै 
एखाद्या खोक्यासारखे दिसणारे हे घर त्याच्या मालकाला वाटेल तेथे आणि वाटेल तेव्हा कधीही घेऊन जाता येते! उत्तर युरोपमध्ये असलेल्या  ऍस्टोनियामधील एका डिझाईन हाऊसने ब्रिटनमधील घरांची समस्या दूर करण्यासाठी हे मॉडेल बनवले आहे. अर्थात् या छोट्याशा घराची किंमतही एखाद्या मोठ्या बंगल्याइतकीच म्हणजे सव्वा कोटी रुपये आहे.हे घर कॉंक्रिटने बनवले आहे. मात्र, त्याचे भाग एकाच दिवसात बनवले गेले असून, ते जोडून संपूर्ण घर सहज फिट करता येते. विशेष म्हणजे जागेच्या हिशेबाने त्याचा आकारही बदलता येतो. युरोपमधल्याच कोडासेमा नावाच्या डिझाईन हाऊसने हे घर बनवले असून, त्याला कोडा हाऊस असे नाव दिले आहे. त्याच्या सव्वा कोटी रुपये किमतीत निर्माण कार्य, साईटवर नेऊन स्थापने, वीज-पाण्याची व्यवस्था आदी सर्व बाबी समाविष्ट आहेत. या घरात ओपन प्लॅन किचन आणि बेडरूम असून, घरात लोफ्टेड बेड आहेत. किचनमध्ये ओव्हन, स्टोवटॉप, ड्रायर्स आणि कॅबिनेट आहेत. एका कोपर्‍यात बाथरूम आणि वर टेरेसही आहे. टेरेसवर सोलर पॅनेल असून, त्यापासून गरजेची वीज निर्माण होते. या घराचा आकार २६९ चौरस फूट एवढा आहे. (वृत्तसंस्था)