हिंदुस्तानियतमुळेच जिवंत आहे कश्मीरियत

0
87

अन्वयार्थ
अमरनाथ यात्रेकरूंची अतिशय क्रूरपणे हत्या करणार्‍या इस्लामी दहशतवाद्यांनी केवळ माणुसकीलाच काळिमा फासला नसून स्वत:च्या धर्मालाही कलंकित केले आहे. देशातील हिंदू-मुसलमानांनी एकत्र येऊन, संघटितपणे व ज्या दृढतेने या हत्याकांडाचा निषेध केला हे जगासाठी एक उदाहरणच आहे. मात्र, हिंदू विरोधी मानसिकता असलेल्या सेक्युलर मीडियातील एक घटकाचे खरेखुरे स्वरूप या घटनेमुळे पुढे आले आहे. हिंदू समाजाच्या वेदनेला कधीही हिंदू या नात्याने प्रकट न करणे आणि हिंदू म्हणून त्याची जी बाजू आहे ती कधीही पुढे येणार नाही याची खबरदारी घेणे हीच या सेक्युलर मीडियाची मानसिकता आहे.
जर कुणा भारतीय मुसलमानावर अत्याचार अथवा हल्ला झाल्यास पीडित व्यक्तीच्या धर्माचा वारंवार उल्लेख करण्यात येतो. एवढेच नव्हे तर हल्लेखोरांना ‘हिंदू कट्टरवादी’ वगैरे संबोधून त्रिशुलधारी लोकांना क्रूर दर्शवून त्यांच्या डोक्यावर भगवी पट्टी बांधलेले दाखवून जणू ते सार्‍या हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, असे दाखविले जाते आणि याउलट पीडित हिंदू असेल आणि हल्लेखोर मुसलमान असेल तर पीडित हिंदूच्या धर्माचा कवडीचाही उल्लेख हे सेक्युलर मीडियावाले करीत नाहीत आणि अशा वेळी इस्लामी दहशतवाद्यांचे चेहरे दाखविण्याचा तर प्रश्‍नच उद्भवत नसतो. हिंदूंची वेदना, वेदना नसते काय? याचेही आम्ही सेक्युलॅरिझमच्या नावाखाली सांप्रदायिकीकरण करणार काय?
अमरनाथ यात्रेकरूंना एक इंचही जमीन उपलब्ध करून देणार नाही, अशी दर्पोक्ती करणारे नेते हिंदूंना काश्मीरमधून हाकलले जात होते तेव्हा चुपचाप बसले होते. आता ते कोणत्या तोंडाने आणि कुठल्या हक्काने कश्मीरियतच्या गोष्टी करीत आहेत? केवळ आणि केवळ हिंदुस्तानियतमुळेच कश्मीरियत जिवंत आहे. हिंदुस्तानशिवाय कुठल्या कश्मीरियतला काहीही अर्थ नाही. कारण जोपर्यंत जिहादी क्रूरकर्म्यांनी इस्लामच्या नावावर हाकलून दिलेले पाच लाख हिंदू सुरक्षितपणे आणि सन्मानपूर्वक काश्मिरात पुन्हा परतत नाहीत तोपर्यंत लोकशाहीला आणि संसदेला काय अर्थ आहे? सर्व काही अपुरे, अर्धवट आहे. काश्मीरकडून आता केरळकडे बघा. दररोज तेथे हिंदूंच्या हत्या होत आहेत. केवळ हिंदुत्वावर आणि हिंदू धर्मावर निष्ठा असल्यामुळेच त्यांना ठार केले जात आहे. केरळमध्ये तर अशी स्थिती आहे की, एखादा स्वयंसेवक सकाळी कामावर गेला तर संध्याकाळपर्यंत तो सुरक्षितपणे घरी परतून येईल याची काहीही शाश्‍वती राहिलेली नाही. घरी स्वयंपाक करून मुलांना वाढणार्‍या त्याच्या आईला सतत ही चिंता भेडसावत असते की, शाखेतून परतणार्‍या त्याच्या मुलाचा पाठीमागून येऊन एखादा माकपवाला त्याच्यावर प्राणघातक हल्ला तर करणार नाही? लोकांची घरेदारे जाळून टाकायला, वृद्ध आईवडिलांनाही ठार मारायला ते मागेपुढे पाहात नाहीत. पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंची वस्ती नेस्तनाबूत करण्याचे उद्योग सातत्याने सुरूच आहेत. कारण ममता बंडोपाध्यायांना मुसलमानांची मते हवी आहेत. पाकिस्तानातून १२, १४ व १६ वर्षांच्या मुलींच्या अपहरणाच्या व त्यांच्या जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाच्या व निकाहाच्या बातम्या सातत्याने येतच असतात. मात्र, या विषयावर सेक्युलर मीडियात एक अक्षरही येत नाही. या हिंदूंची वेदना त्यांच्या कानावर जातच नाही. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशातील हिंदूंची परिस्थितीही अतिशय वाईट आहे. त्यांच्यावर सातत्याने अत्याचार व हल्ले होत आहेत आणि हल्लेखोरांना राजकीय संरक्षणही मिळत आहे. हिंदूंनी हा विध्वंस, हे अत्याचार आणि हल्ले किती काळ सहन करायचे? अजून किती हाल सहन करायचे? आणि हे सगळे का तर ते केवळ हिंदू आहेत म्हणून?
राष्ट्रपतिपदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर जवळजवळ सर्वांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, सोशल मीडियातील जिहादी मुस्लिम व कम्युनिस्ट भाजपाच्या या अभूतपूर्व आणि लोकप्रिय निर्णयामुळे अतिशय खवळून गेले, अक्षरश: वेडेपिसे झाले आणि त्यांनी ट्विटरवरून शिवीगाळीची भाषा सुरू केली. ख्यातनाम विचारवंत आणि देशप्रेमाने व राष्ट्रीय वृत्तीने आपली लेखणी झिजविणार्‍या निपुर शर्मा यांनी राणा अयूबविरुद्ध पोलिसांत तक्रार केली तेव्हा ही गोष्ट लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे तारे सदानंद द्युमेसारख्या विदेशी वर्तमानपत्राच्या स्तंभलेखकाने तोडले. विदेशात राहून मन विदेशी कसे होते हे आम्हाला अद्याप कळलेले नाही. कारण भारतातही असे अनेक जण आहेत. भलेही शरीराने ते स्वदेशातच असतील पण त्यांचे मन मात्र विदेशातच गुंतलेले असते. केरळमध्ये मारल्या जाणार्‍या स्वयंसेवकांबद्दल त्यांना कवडीचेही दु:ख वाटत नाही. काश्मीरच्या हिंदूंची वेदना व आक्रोश त्यांच्या कानापर्यंत जात नाही. मात्र, प्रणय राय यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येताच शांतीचे ठेकेदार असलेल्या या सेक्युलॅरिस्टांच्या नाकाला मिरच्या झोंबतात. आपल्यापेक्षा भिन्न मत बाळगणार्‍यांना अफजलखान व स्टॅलिनने ज्याप्रमाणे आपले दरवाजे बंद केले होते अगदी त्याचप्रमाणे कथित सेक्युलर टीव्ही वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनीही आपापले दरवाजे राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांसाठी बंद करून टाकले आहेत. केवळ हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्यामुळे आणि राष्ट्रवादी भूमिका मांडत असल्याने ही सेक्युलर वर्तमानपत्रे आपल्या संपादकीय पानावर यांचे लेख व पत्रे प्रकाशित करीत नाहीत. तसेच टीव्ही वाहिन्यांकडूनही या राष्ट्रवाद्यांची नेहमीच उपेक्षा केली जाते. राष्ट्रवादी भूमिका मांडणार्‍या आणि उजव्या विचारसरणीच्या वर्गावर एकतर्फी हल्लाबोल करणे आणि हिंदुत्वाविषयी शिवीगाळीची भाषा करणे हेच सेक्युलॅरिस्टांच्या दृष्टीने अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.
दार्जिलिंगमध्ये गोरखा समाजावर भाषेच्या नावाखाली ममताचे अत्याचार वस्तुत: मुस्लिम तुष्टीकरणासाठी हिंदू समाजावर आघातच आहे. गोरखा समाज पराक्रमी आणि देशभक्त आहे. अत्यंत धर्मनिष्ठ आहे. गोरक्षा या शब्दातूनच गोरखा शब्दाची उत्पत्ती झाली आहे. जे गोरक्षक होते त्यांना गोरखा असे संबोधण्यात आले. त्यांना काय आपल्या भाषेचे, संस्कृतीचे रक्षण करण्याचा अधिकार नाही? जर दार्जिलिंग मुस्लिमबहुल असते तर ममतांनी अशी वर्तणूक कधीच केली नसती. जर त्यांना पूर्ण मोकळीक दिली तर मुसलमानांच्या मतांसाठी त्या उर्दू भाषाही सर्वांवर लादू शकतात. मात्र, हिंदू गोरखा समाजाची भाषा त्यांना मान्य नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात जर भारत जिंकला नाही तर कुणाला आनंद व्हायला पाहिजे? आणि ज्याला आनंद झाला त्याने काय केले पाहिजे? अखेर आमचे आपसात काही नाते आहे आणि त्या नात्याचे नाव भारतीयता आहे. त्यामुळेच आपण परक्यांनाही आपले समजतो. जर आपण एक दुसर्‍याच्या सुखदु:खात सहभागी होणार नसलो तर मग आपलेपणाची व्याख्याच बदलावी लागेल.
काश्मिरात काही दिवसांपूर्वी शहीद झालेले लेफ्टनंट उमर फ़ैयाज आणि पोलिस उपनिरीक्षक फिरोज दार यांच्यावर दहशतवादी यासाठी संतप्त होते. दार भारताचा तिरंगा आणि राज्यघटनेशी निष्ठावान होते. वस्तुस्थिती ही आहे की, ९९ टक्के काश्मिरी मुस्लिम आजही एक भारतीय या नात्याने सन्मानजनक आणि सुखाचे जीवन व्यतित करू इच्छित आहेत. जे थोडेबहुत विश्‍वासघातकी आणि आपल्याच देशबांधवांशी व मातृभूमीशी प्रतारणा करणारे लोक आहेत त्यांना दिल्लीच्या मीडियाचा आधार मिळतो. आम्ही या देशद्रोही लोकांच्या मुलाखती सेक्युलर वर्तमानपत्रातून वाचल्या आहेत. जे मुस्लिम काश्मीरशी आणि भारताशीही एकनिष्ठ आहेत आणि राष्ट्राच्या एकतेची गोष्ट करतात त्यांची मुलाखत एका तरी सेक्युलर वृत्तवाहिनीने दाखविली किंवा वर्तमानपत्रांनी छापली आहे काय? काश्मीरचे दगडफेक करणारे तरुण आणि हुर्रियतचे देशद्रोही सदस्यच केवळ काश्मीर खोर्‍याचे प्रतिनिधित्व करतात हेच दिल्लीतील मीडिया दाखवू इच्छिते.
राम, कृष्ण आणि शिवाच्या उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणाची गोष्ट केली तरी सेक्युलर मीडिया त्याच्यावर तुटून पडते. सातत्याने विदेशी आक्रमणामुळे आमची जी मानसिक गुलामीची अवस्था झाली आहे, त्याचाच हा परिणाम आहे. काश्मीरमधील ७०० हून अधिक अशी सुंदर व भव्य मंदिरे आहेत जी धर्मांध जिहादींनी उद्ध्वस्त करून टाकली आणि याचे संपूर्ण दस्तऐवज आजही उपलब्ध आहेत. मात्र, आजही हिंदू बचावात्मक पवित्रा घेऊन त्या उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्याची गोष्ट करण्यासही घाबरतो.
सदियों का दर्द है
संभाले नही संभलता
थमते थमते थमेंगे आंसू
ये रोना है
कोई हंसी तो नही
– तरुण विजय