महामार्गावर झाला विचित्र अपघात

0
257

वॉशिंग्टन, १५ जुलै
अमेरिकेच्या महामार्गावर अत्यंत विचित्र अपघात घडला आहे. साडेतीन हजार किलोपेक्षा जास्त ईल माशांना घेऊन एक ट्रक निघाला होता, पण ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातादरम्यान ट्रकमध्ये असणारे ईल मासे रस्त्यावर पडले होते. हे मासे रस्त्यावर पडल्यावर त्यांच्या शरीरातून पांढर्‍या रंगाचा पदार्थ बाहेर पडायला सुरूवात झाली होती.
अपघातात मासे रस्त्यावर पडले आणि त्यामुळे पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरला. खरंतर जेव्हा हे मासे एखाद्या परिस्थितीत सापडतात तेव्हा त्यांच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो. अमेरिकेच्या हायवेवरील या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
महामार्गावर अपघात झाल्याने तेथून जाणार्‍या गाड्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरल्याने गांड्याना पुढे जाणं कठीण झालं होतं. त्यामुळे गाड्यांचे नुकसानही झाले.
हे मासे रस्त्यावरून साफ करायला बरीच मेहनतही करावी लागली. अमेरिकेच्या महामार्ग क्रमांक १०१ वर ही घटना घडली आहे. रस्त्याची साफसफाई करताना बऱेच मासे मारले गेले आहेत. ईल माशांना हॅगफिश असेही बोलले जाते. ईल मासे त्यांच्या ग्रंथीतून पांढरा चिकट पदार्थ शरीराबाहेर सोडत असतात. त्यामुळे समुद्रात असताना इतर मोठ्या माशांपासून त्यांना त्यांच रक्षण करता येते. प्रशांत महासागच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात ईल मासे आढळून येतात.(वृत्तसंस्था)