टेक महिंद्रा अमेरिकेत २,२०० नव्या लोकांना देणार संधी 

0
227

न्युयॉर्क, १६ जुलै
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख भारतीय असलेल्या टेक महिंद्राने आपल्या अमेरिकेतील व्यवसायासाठी यावर्षी २,२०० नव्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत टेक महिंद्रामध्ये ६,००० कर्मचारी कार्यरत असून, ४०० ग्राहक आहेत.
गेल्या वर्षी आम्ही २,२००० लोकांची नियुक्ती केली होती आणि या वर्षीदेखील तसेच करण्याची आमची योजना आहे, असे टेक महिंद्राच्या स्ट्रॅटेजिक व्हर्टिकल्स विभागाचे अध्यक्ष लक्ष्मणन् चिदंबरम् यांनी सांगितले.अमेरिकन सरकारची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे चिदम्बरम् यांनी स्पष्ट केले. तसेच, काही विशिष्ट तंत्रज्ञान स्थानिकांच्या मदतीने अधिक यशस्वी होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)