कुबोट-मेलो, मकारोव्हा-व्हेसनिना दुहेरीचे विजेते

0
88

विम्बल्डन टेनिस
लंडन, १६ जुलै 
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत लुकास कुबोट (पोलंड) व मार्सेलो मेलोने (ब्राझील) पुरुष दुहेरीचे, तर रशियाच्या एकतारिना मकारोव्हा व इलिना व्हेसनिनाने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सेंटर कोर्टवर विद्युत झोतात चार तास ३९ मिनिटे पाच सेट्‌समध्ये रंगलेल्या या अटीतटीच्या अंतिम सामन्यात कुबोट-मेलोने ओलिव्हर मराच (ऑस्ट्रिया) व मॅटे पॅव्हिक (क्रोएशिया) या जोडीवर ५-७, ७-५, ७-६(२), ३-६, १३-११ अशी मात केली. महिला दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रशियाच्या जोडीने हाओ चिंग चान (तायवान) व मोनिका निकूलेस्कू (रोमानिया) या जोडीवर ६-०, ६-० अशी सरळ विजय नोंदविला. दुसरे सीडिंग असलेल्या या रशियाच्या जोडीचे हे तिसरे ग्रॅण्ड स्लॅम दुहेरीचे विजेतेपद असून यापूर्वी त्यांनी २०१३ मध्ये फ्रेंच ओपन व गतवर्षी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. २०१५ मध्ये ही जोडी ऑल इंग्लंड क्लबमध्ये उपविजेती राहिली होती. अव्वल सीड बेथानिया मटेक-सॅण्ड्‌स (अमेरिका) व लुसी सफारोव्हा (झेक प्रजासत्ताक) या जोडीने माघार घेतली. पहिल्या सामन्यातच मटेक सॅण्ड्‌स दुखापतीने त्रस्त झाली होती. (वृत्तसंस्था)