बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी जयकर कायम

0
25

-जिल्हा व शहर कार्यकारिणी गठित
नागपूर, १६ जुलै
महानगरपालिका निवडणुकीत बसपातील वाद चव्हाट्यावर आल्याने बसपाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. बसपा प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी जिल्हाध्यक्षपदी नागोराव जयकर यांना कायम ठेवले असून, जयकर यांनी नव्याने शहर व जिल्हा कार्यकारिणी गठित केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बसपातून बाहेर पडून डॉ. सुरेश माने यांनी नवीन पक्ष स्थापन केला. महानगरपालिका निवडणुकीतही तोच प्रकार घडला. महानगरपालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, अशा असंतुष्टांनी बहुजन सेना नावाचा पक्ष स्थापन केला. बहुजन समाज पार्टीला रिपब्लिकन पक्षासारखे ङ्गाटाङ्गुटीचे ग्रहण लागल्याने या पक्षाची ताकदही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रदेश नेतृत्व पक्ष वाढविण्यात कमी पडत आहे. त्यामुळे त्यांच्या उचलबांगडीची अधूनमधून मागणी केली जाते. परंतु, पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती याकडे दुर्लक्ष करतात. उत्तरप्रदेशापलीकडे मायावतींना पक्ष दिसतच नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर बसपाची अनेक नेतेमंडळी कायम आहेत. बसपाच्या जिल्हाध्यक्षपदी नागोराव जयकर यांना कायम ठेवण्यात आले असून, त्यांनी शहर व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
जिल्हा कार्यकारिणी-
अध्यक्ष नागोराव जयकर, उपाध्यक्ष बावनकुळे, सुरेखा डोंगरे, एकनाथ वर्‍हाडे, महासचिव नवनीत धडाडे, नितीन नागदेवते, आनंद सोमकुवर, सचिव सुनील बारमाटे, रूपराव नारनवरे, सागर वर्‍हाडे, कोषाध्यक्ष सोहेब परवेज, बीव्हीएम अजय शेवाडे, जितेंद्र घोडेस्वार, बामसेङ्ग राहुल लांडगे, जिल्हाप्रभारी राजकुमार बोरकर, बाबुल डे, विलास भोंडे, दिनेश रंगारी, नरेंद्र शेंडे, पंकज दुबे, पृथ्वी शेंडे, वसंत खवास.
शहर कार्यकारिणी-
अध्यक्ष राजू चांदेकर, उपाध्यक्ष सोनिया रामटेके, सुहास नानवटकर, महासचिव अमित हाडके, विराज ढोणे, रोहित वाल्दे, सचिव धनराज धडकाळे, अनिल आत्राम, अमित सिंह, कोषाध्यक्ष रोशन मेश्राम, बीव्हीएङ्ग संजय शेगावकर, शहर प्रभारी संजय शेलोटकर, अजय पटले, शैलेश यादव, गुणवंत गिरटकर, ऍड. सुनील लाचरवार.