कार्तिकने केला ४४ सेकंदात विक्रम

0
39

– इंडिया बुक ऑङ्ग रेकार्ड्‌स आणि एशिया बुक ऑङ्ग रेकार्ड्‌समध्ये नोंदविले नाव
– ४४ सेकंदात ७७० टाईल्स ङ्गोडल्या
नागपूर, १६ जुलै
देशात अनेक खेळाडू विक्रम करीत असतात. काही विक्रम मोडले जातात तर काही अजरामर राहतात. अशातच नागपुरातील १६ वर्षीय युवा प्रतिभावंत कराटेपटू कार्तिक जयस्वालने ४४ सेकंदात ७७० टाईल्स ङ्गोडण्याचा विक्रम करीत नागपूरचे नाव उंचावले. संत रविदास सभागृहात कार्तिक जयस्वालने नवा विक्रम प्रस्थापित केला.
कार्तिक जयस्वालने इंडिया बुक ऑङ्ग रेकार्ड्‌स आणि एशिया बुक ऑङ्ग रेकार्ड्‌सने दिलेले आव्हान स्वीकारीत १६ सेंकद शिल्लक ठेवीत विक्रम केला आहे. विशेष म्हणजे तेजस्विनी विद्या मंदिरचा विद्यार्थी असलेल्या कार्तिकने नुकत्याच झालेल्या शालान्त परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवीत अभ्यासातही हुशार असल्याचे सिद्ध केले. कार्तिक जयस्वालने राष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले होते.
प्रशिक्षक मजहर खान यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित सराव करतो. त्याच्या या कामगिरीबद्दल मजहर खान म्हणाले, कार्तिकने वयाच्या मानाने खूप मोठे आव्हान स्वीकारीत विक्रम प्रस्थापित केला. त्याची ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद असून भविष्यात कार्तिक एका मिनिटात १ हजार टाईल्स ङ्गोडण्याचा विक्रम करेल. कार्तिकच्या या कामगिरीमुळे त्याने नवीन विक्रम केला आहे. या विक्रमाचे परीक्षण इंडिया बुक ऑङ्ग रेकॉर्ड्‌सचे डॉ. मनोज तत्त्वादी तसेच एशिया बुक ऑङ्ग रेकॉड्‌र्सच्या डॉ. सुनीता धोटे यांनी केले. विश्‍वविक्रमवीर शेङ्ग विष्णू मनोहर यांच्या हस्ते कार्तिकचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कलचुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कलचुरी एकता महासंघ महाराष्ट्र प्रदेश प्रमुख दीपक जयस्वाल, तेजस्विनी विद्या मंदिरचे अध्यक्ष डॉ. वागेश कटारिया, प्रशिक्षक मजहर खान तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी कार्तिक म्हणाला की, माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचा मला आनंद आहे. याकरिता मी अथक मेहनत घेतली. यासाठी माझ्या परिवारातून आणि कलचुरी एकता महासंघाकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच मी विक्रम प्रस्थापित करू शकलो. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत विश्‍वविक्रम करण्याचा मानस त्याने यावेळी व्यक्त केला.