शेतकर्‍यांना उत्पन्नाचा आधार द्या : डॉ. खांदेवाले

0
56

– दक्षिणायन महाराष्ट्र संघटनेतर्ङ्गे परिसंवाद
नागपूर, १६ जुलै
आज अमेरिका व युरोपातील शेतकरी आनंदी जीवन जगत आहे. यास तेथील शेतकर्‍यांमध्ये कार्यक्षमता आहे म्हणून नव्हे तर तेथील सरकारतर्ङ्गे देण्यात येणारा उत्पन्नाचा आधार हे मुख्य कारण आहे. त्यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर केवळ स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला हमीभाव द्या, असे म्हणून चालणार नाही, तर शेतकर्‍यांना उत्पन्नाचा आधार द्यावा, अशी मागणी सरकारकडे रेटून धरावी लागेल, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले.
दक्षिणायन महाराष्ट्र, लोकशाही हक्क संरक्षण आणि शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ‘जागतिकीकरणामुळे शेतकर्‍यांवर होणारे परिणाम, शेतकर्‍यांच्या आत्महत्या व शेतमालाचे भाव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजय जावंधिया व अमिताभ पावडे उपस्थित होते.
डॉ. खांदेवाले म्हणाले, डब्ल्यूटीओमध्ये आंतराष्ट्रीय व्यापार मुक्त असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद आहे. मात्र, डब्ल्यूटीओने निर्माण केलेली व्यवस्था मुक्त व्यापार पद्धती नसून मार्केट विरोधी पद्धती आहे. या पद्धतीला ‘मॅनेज सिस्टिम’ असे देखील म्हणता येईल. अमेरिका, युरोपातील शेतकर्‍यांना तेथील सरकार उत्पन्नाचा आधार देते. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांना नुकसान होण्याचे कारणच नाही. तसेच तेथील शेतकरी पर्यावरण हरित ठेवतो, असे म्हणून सबसीडी देखील वाढवून दिल्या जातात. आपल्या देशात मात्र याविरुद्ध परस्थिती आहे. विकसित देशातील माल जागतिक स्तरावर कमी भावात विकला तरी त्याचा ङ्गायदा त्यांना होणारच आहे. मात्र, आपल्याकडील शेतकर्‍यांना या सुविधा नसल्याने स्पर्धेत टिकता येत नाही. तसेच या डब्ल्यूटीओ म्हणजेच आधुनिक साम्राज्यवाद शस्त्रामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे, असेही ते म्हणाले.
अमिताभ पावडे म्हणाले, आज अन्नसुरक्षा कार्डापेक्षा रोजगार सुरक्षिततेची देशाला खरी गरज आहे. जागतिकीकरणामुळे आर्थिक विषमतेमध्ये वाढ झाली असून, त्याचा सर्वाधिक त्रास शेती क्षेत्राला झाला आणि त्यामधूनच बेरोजगारीची निर्मिती झाली आहे. कुठलेही सरकार सत्तेवर येताना सामान्यांना जीवनावश्यक वस्तुंची वाढ होऊ देणार नाही, असे आश्‍वासन हमखास देते. तसेच शेतकर्‍यांच्या उत्पादनाचे भाव वाढणारच नाही, असा सापळा तयार करते. त्यामुळे शेतकरी वर्ग लयास गेला आहे. यावेळी विजय जावंधिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येची टिंगल बंद करा
शेतकर्‍याची आत्महत्या झाली म्हटले की, तो दारू पीत होता. त्याचे बायकोसोबत भांडण झाले म्हणून त्याने आत्महत्या केली, असा शहरी, राजकारणी आणि अन्य लोकांचा एकंदर समज असतो. मात्र, त्याने आत्महत्या का केली? या खर्‍या प्रश्‍नापर्यंत जाण्याची कुणाचीही इच्छा नसते. काही लोक म्हणतात की, १ लाखाची मदत मिळते म्हणून त्याने आत्महत्या केली. शासनाने शेतकर्‍यांच्या आत्महत्येची ही टिंगलटवाळी बंद करून शेतकर्‍याला मदत करणारी, त्याला प्रतिसाद देणारी शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याची आज खरी गरज आहे, असे डॉ. खांदेवाले म्हणाले.