अनुत्तीर्णांना प्रवेश देणारे स्मिथ महाविद्यालय!

0
63

नवी दिल्ली, १७ जुलै 
चांगल्या महाविद्यालयातील कटऑफ लिस्टची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. टॉपर व चांगले मार्क मिळविणार्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यास फारशा अडचणी येणारही नाहीत. मात्र ज्यांना परीक्षेत अपयश आलेय त्यांच्यापुढे भविष्य काय असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. अमेरिकेतील एका कॉलेजात मात्र फक्त नापासांनाच प्रवेश देणारे स्मिथ या नावाचे महाविद्यालय असून ते मॅसेच्युसेट विद्यापीठाशी संलग्न आहे.
या कॉलेजमध्ये नापासांसाठी फेलिंग वेल नावाचा एक विशेष कोर्स चालविला जातो व कोर्स पूर्ण करणार्‍याला फेलियर प्रमाणपत्रही दिले जाते. विशेष बाब अशी की या महाविद्यालयातही प्रवेश घेण्यासाठी रांगा लागू लागल्या आहेत. अपयशामुळे निराश झालेल्याना भविष्याची चिंता भेडसावते व अनिश्चततेच्या वातारवणात ही अपयशी मंडळी गोते खात राहतात. या कॉलेजात अपयशाचेही काही चांगले फायदे होतात हे विद्यार्थ्यांना सप्रमाण शिकविले जाते.
भविष्यातील संधी, आयुष्यात पुढे जाण्याची माहिती येथे दिली जाते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळतो व फक्त शिक्षणात अपयशी ठरलेल्यांनाच नाही तर नोकरी, मैदान, नातेसंबंध अशा आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात अपयश आले असेल तरी विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतो.
जीवनातल्या या निराश करणार्‍या प्रसंगातून बाहेर पडण्याचे व सकारात्मक विचार करण्याचे तसेच अन्य क्षेत्रात प्रगती कशी करता येते याचे शिक्षण येथे दिले जाते. त्यासाठी विशेष लेक्चर आयेाजित केली जातात. (वृत्तसंस्था)