ओमपुरींचे मिस्टर काबाडीमधून अखेरचे दर्शन

0
154

मुंबई : बॉलीवूडमधील ताकदीचा अभिनेता अशी प्रसिद्धी मिळविलेल्या ओम पुरी यांचा अखेरचा चित्रपट अशी सलमानखानच्या ट्यूबलाईट सिनेमाची नोंद झाली असली तरी ओम पुरी यांच्या निधनानंतर तो प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता. कारण ओम पुरी यांनी ज्या चित्रपटात अभिनय केला तो मिस्टर कबाडी हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत असून तो त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या पहिल्या पत्नी सीमा पुरी यांनी केले आहे. या संदर्भात बोलताना सीमा म्हणाल्या, हा व्यंग्यात्मक कॉमेडी चित्रपट आहे व यात अन्नू कपूर मुख्य भूमिकेत आहे. यात एक भंगारवाला कसा श्रीमंत बनतो व आपला व्यवसाय कसा वाढवितो याचे विनोदी चित्रण केले गेले आहे. या दोघांसोबत या चित्रपटात सारिका, विनय पाठक, राजवीरसिंह, कशिश वोरा यांच्याही भूमिका आहेत. ओम पुरी यांचे याच वर्षात हृदयविकारने निधन झाले आहे.