कच्चा लिंबूचे ट्रेलर प्रदर्शित

0
131

मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या चित्रपटाचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाचे पहिल्यांदा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रदर्शित झाल्यावर अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. सचिन खेडेकर, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी आणि मनमीत प्रेम अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात पाहायला मिळतेय. चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून उतरलेला हा चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण प्रेक्षकांच्या या अपेक्षांना हा चित्रपट खरा उतरतो की नाही हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. स्वरूप रिक्रिएशन ऍण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.