सनीच्या गाण्यावर थिरकला ख्रिस गेल

0
162

मुंबई : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलला तुम्ही ‘चॅम्पियन’वर डान्स करताना पाहिले असेल. गेलने नुकताच इन्स्टाग्रामवर गेलने एक व्हिडीओ अपलोड केला, यात अभिनेत्री सनी लिओनीच्या ‘लैना’ गाण्यावर थिरकला आहे. हिरव्या रंगाचा पदडा या व्हिडीओमध्ये गेलच्या मागे आहे, ज्यावरून तो जाहिरातीचे चित्रीकरण करत असल्याचे स्पष्ट होते. गेलने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे की, अशा प्रकारे जो कोणी डान्स करेल त्याला मी ५ हजार डॉलर्स देणार आहे. केवळ पुरुषांनाच नाही तर हे आव्हान महिलांना देखील आहे. लवकरच फूटबॉल टीम खरेदी आणि भारतीय स्टार्टअप्समध्ये ख्रिस गेल पैसा गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. जगात सर्वाधिक कमाई करणार्‍या क्रिकेटरच्या बाबतीत गेल तिसर्‍या क्रमांकावर आहे. गेल भलेही वेस्ट इंडिजसाठी कमी क्रिकेट खेळतो, पण त्याने २०१७ मध्ये विविध टी-२० लीगमधून ४.५ दशलक्ष डॉलर्स तर जाहिरातींमधून ३ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.