हिंगीस-जेमी मिश्र दुहेरीचे विजेते

0
112

लंडन, १७ जुलै 
स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस व ब्रिटनच्या जेमी मरे या जोडीने गतविजेत्या हीथर वॉटसन व हेनरी कोंटिनेन या जोडीला पराभवाचा धक्का देत विम्बल्डन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सेंटर कोर्टवर रंगेलल्या अंतिम सामन्यात हिंगीस-मरेने वॉटसन-हेनरी या जोडीवर लागोपाठ सेट्‌समध्ये ६-४, ६-४ असा विजय नोंदविला. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रमी आठव्यांदा पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर हिंगीसच्या विजयाने स्वित्झर्लंड संघाला दुहेरी आनंद मिळवून दिला. ऑल इंग्लंडमध्ये हिंगीसने २० वर्षांपूर्वी पहिले विजेतेपद मिळविले होते. आता तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. हिंगीसचे हे सहावे मिश्र दुहेरीचे विजेतेपद असून तिच्याकडे महिला दुहेरीचे १२ किताब आहे. ब्रिटनचा अव्वल मानांकित ऍण्डी मरेचा थोरला बंधू जेमी मरे याचे हे १० वर्षातील हे दुसरे मिश्र दुहेरीचे विजेतेपद आहे. त्याने सर्बियाच्या येलेना जांकोविचसोबत पहिले मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)