बिल गेट्‌स यांच्या संपत्तीत अनोख्या वस्तूंचा समावेश

0
65

नवी दिल्ली, १७ जुलै 
जगातील सर्वात श्रीमंत व सॉफ्टवेअर जायंट मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांची संपत्ती त्यांच्याकडे असलेल्या अनोख्या वस्तूंमुळे अधिक खास बनली आहे.
बिल गेट्‌स यांच्या घराची किंमत १२३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७९० कोटी रुपये आहे शिवाय दरवर्षी ते १० लाख डॉलर्सची मालमत्ता खरेदी करतात. त्याच्या घरात २० फूट उंची असलेल्या खोलीत ट्रँपलीन आहे व यावर उड्या मारून खूप उंच उडी मारता येते. त्यांच्या घराजवळ कृत्रिम जलस्त्रोत आहे व यात किंमती समजले जाणारे सामन मासे मिळतात. त्यांची लायब्ररी घुमटाकार असून त्यात १९९४ साली गेट्‌स यांनी लिलावात विकत घेतलेले लियोनार्डो द विंची यांचे हस्तलिखित आहे. घरातच ६० फूट खोलीचा स्विमिंग पूल असून त्यात अंडरवॉटर म्युझिक सिस्टीम आहे. घरातील भितींवर असलेली मौल्यवान पेंटिंग्ज, फोटो फ्रेम केवळ १ बटन दाबून बदलता येतात. येथे २० लोकांचे होम थिएटर आहे व त्यात पॉपकॉर्न मशीनही बसविले गेले आहे.  कलेत गेट्‌स यांना चांगलीच रुची आहे. त्यांच्या संग्रहात विन्सलो होमरचे लॉस्ट ऑन द ग्रॅण्ड बँक हे पेेंटिंग आहे व त्यासाठी गेट्‌स यांनी ३६ दशलक्ष डॉलर्स किंमत मोजली आहे. गेट्‌स यांचे खासगी बॉंबार्डिया जेट विमान कोणत्याही कार्पोरेट जेटपेक्षा कमी नाही. त्यांच्याकडे मोठे कार कलेक्शन आहे व त्यात १९८८ ची पोर्श ९५९ कूपे, पोर्श ९११ करेरा व पोर्श ९३० यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)