इंडियामार्टला सर्वोत्कृष्ट ऍपचा पुरस्कार

0
76

बंगळुरु, १७ जुलै 
नुकताच पार पडलेल्या ग्लोबल मोबाइल ऍप समिट अवॉर्ड २०१७ सोहळ्यातील व्यापार गटात सर्वोत्कृष्ट ऍपचा पुरस्कार मार्केटप्लेस इंडियामार्टला देण्यात आला आहे.
हा सोहळा बंगळुरूत संपन्न झाला. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, या ऍपला त्याचे फीचर्स, ऑप्शनल सोल्यूशन आणि यूजर फ्रेंडली एक्सपिरिअंससाठी हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. त्यामुळेच या ऍपमार्फत अगदी सहजपणे व्यापार करता येतो. प्ले स्टोअरमध्ये ४.४ रेटिंगसह इंडियामार्ट ऍप ई-कॉमर्स आणि ऑनलाइन मार्केटप्लेसमध्ये अव्वल स्थानी आहे. आत्तापर्यंत इंडियामार्टला ६७ टक्के यूजर्सने ५ स्टार रेटिंग दिले आहे.
इंडियामार्टेचे संस्थापक दिनेश अग्रवाल म्हणाले की, इंडियामार्टमध्ये आम्ही ग्राहकांना लक्षात ठेऊन उत्पादन तयार करतो. मागील ४ वर्षापासून आम्ही ऍप यूजर्सच्या प्रत्येक फीडबॅकवर लक्ष ठेऊन आहोत. हे ऍप अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोजवर उपलब्ध असून, आतापर्यंत तब्बल ५० लाख लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. (वृत्तसंस्था)