अमृत, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्या शुभारंभ

0
54

– मुख्यमंत्री मुंबईत दाबणार वेबकास्ट
नागपूर, १७ जुलै
शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहर पोलिसांसाठी उेाारपव अपव उेपींीेश्र उशपींीश (उउउ) इमारतीचे व नागपूर शहरातील हरित क्षेत्र प्रकल्पाचे ई-भूमिपूजन बुधवार १९ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होत आहे. मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या मुंबईस्थित वर्षा निवासस्थानातील सभागृहात होत असून, नागपुरातील प्रकल्पाचा शुभारंभ राजे रघुजी भोसले सभागृह, नगरभवन महाल येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व वेबकास्टद्वारे होणार आहे.
या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अश्‍विन मुदगल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महापौर नंदा जिचकार यांनी स्थानिक मंत्री, आमदार व खासदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. केंद्र शासनाद्वारा अमृत अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा, मलनि:सारण व हरित क्षेत्र प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच स्मार्ट सिटी अभियानातील काही प्रकल्पांचाही ई-शुभांरभ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात उेाारपव अपव उेपींीेश्र उशपींीश तयार करण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयासाठी तयार करण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे गुन्ह्यांचा तत्काळ तपास करणे व गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सुनियोजितपणे संचालन करणे आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणे या कंट्रोल सेंटरमुळे शक्य होणार आहे. अमृत योजनेतील हरित क्षेत्र विकास योजनेंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या उद्यानांमध्ये नागपूर शहरातील जागृतीनगर व तुलसी विहार कॉलनी येथील उद्यानांचा समावेश आहे. नागपूरकरांसाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहेत.