ब्लॉगर चुगानी यांची हायकोर्टात क्षमायाचना

0
54

– फेसबुक पेजवर न्यायालयाचा अवमान
नागपूर, १७ जुलै
सोशल मीडियावर न्यायालयाचा अवमान करणारे मुंबईचे ब्लॉगर आय. के. चुगानी यांनी सोमवारी एका पत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त क्षमा मागितली. या प्रकरणी न्यायालयाने चुगानी यांना पुढील सुनावणीला स्वत: किंवा वकिलाच्या मार्फत हजर राहण्याचे निर्देश दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज तयार करण्यात आले असून, यावर टाकण्यात येत असलेल्या अश्‍लील पोस्टमुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली असून न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. श्रीरंग भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने फेसबुक आणि ट्विटरच्या मुख्यालयांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. या प्रकरणी सोमवारी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी ब्लॉगर आय. के. चुगानी यांनी हायकोर्टाला लिहिलेल्या एका पत्राद्वारे न्यायालयाची बिनशर्त क्षमा मागितली. न्यायालयाने चुगानी यांना पुढील सुनावणीला हजर होण्याचे आदेश दिले आहेत.