एसकेएफची पहिल्या तिमाहीत ७२१ कोटींची विक्री 

0
30

पुणे, ४ ऑगस्ट 
एसकेएफ इंडियाने ३० जून अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत ७२१ कोटींची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ही विक्री ७०३ कोटी १३ लाख रुपये होती. याच काळातील करभरणा केल्यानंतरचा लाभ ६४ कोटी २७ लाख रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ६० कोटी ४० लाख रुपये एवढा होता. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कंपनीला सुमारे चार कोटींचा फायदा झाला आहे.
याप्रसंगी बोलताना एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा म्हणाले की, निश्‍चलनीकरणाच्या परिणामातून बाजारपेठा सावरत असताना आणि जीएसटीयुगात प्रवेश करण्याची तयारी करत असताना, आर्थिक स्थिती आधीच्या तिमाहीपेक्षा फारशी बदलली नाही. चांगला पाऊस आणि डिजिटलायझेशनच्या मागोमाग हळूहळू परंतु निश्‍चितपणे  होणार्‍या बदलांचा आधार मिळालेल्या नवीन करप्रणालीचे अपेक्षित फायदे अर्थव्यवस्थेत प्रतिबिंबित होतील, याचा आम्हाला विश्‍वास आहे.   (वृत्तसंस्था)